Home महाराष्ट्र आंदोलनाचे ठिकाण बदलल्याने नाराजी

आंदोलनाचे ठिकाण बदलल्याने नाराजी

0
संग्रहित छायाचित्र

आंदोलनाचे स्थान विधान भवन परिसरापासून लांब हलवण्यात आल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

संग्रहित छायाचित्र

नागपूर – आंदोलनाचे स्थान विधान भवन परिसरापासून लांब हलवण्यात आल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. यासंबंधी स्थानिकांनी दाखल केलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेनुसारच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

हिवाळी अधिवेशनात केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून अनेक संघटना, संस्था, अन्यायग्रस्त, पीडित तसेच बेरोजगार आपल्या समस्या घेऊन आंदोलन करत असतात. मागील वर्षीपर्यंत हे मोच्रे, धरणे विधान भवन परिसरात होत असत. मात्र यंदापासून आंदोलनकर्त्यांचे अंतर दुपटीने लांब ठेवण्यात आले आहे.

मॉरेस कॉलेज मैदानाच्या निश्चित केलेली जागाही गरसोयीची ठरत असून उपोषणकर्त्यांचा आवाज सरकार व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचू नये, अशी व्यूहरचना असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आजवरच्या जागेवरून आमदार निवासासह अधिवेशनाची इमारतही जवळ होती. तसेच रवीभवनातील मंत्र्यांची भेट घेणे शक्य होते. परंतु आता या स्थळांपासून सभोवतार भिंतींचे कुंपण असलेल्या मैदानात आंदोलन करून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकत्रे विलास भोंगाडे यांनी जनतेला घटनेने दिलेल्या अधिकाराचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून आजवर विविध ‘एनओसी’च्या माध्यमांनी आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रकार होत आहे. आता तर शासन-प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी वाढवून आंदोलकांचा आवाज दाबण्याचा कट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘एलबीटी’विरोधात शुक्रवारी बंद
नागपूर : ‘विदर्भ ऑफ कॉमर्स’च्या एलबीटीविरोधी संघर्ष समितीने १३ डिसेंबर रोजी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या दिवशी व्यापारी दुकाने बंद ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यातील २६ महापालिकांपैकी २५ पालिकांत ‘एलबीटी’ लागू करण्यात आला असून त्यापैकी २४ ठिकाणी उत्पन्न कमी आल्याने हा प्रयोग अयशस्वी ठरल्याची ओरड आहे. या अनुभवाचा आधार घेऊन आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना एलबीटी रद्द करण्याचे निवेदन या वेळी देण्यात येणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version