Home टॉप स्टोरी असे आहे विधानसभेतील पक्षीय बलाबल

असे आहे विधानसभेतील पक्षीय बलाबल

0

विधानसभा निवडणूकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या आधीच राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे.
मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभेच्या २८८ जागांसाठी एका टप्प्यातच मतदान होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या आधीच राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजप-शिवसेना या पक्षांमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाही.

२००९च्या निवडणुकीत काँग्रेसने १७० जागां लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांना ८२ जागांवर विजय मिळवता आला होता. विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ६२ जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी ११३ जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ४६ जण निवडूण आले होते. तर शिवसेनेला १६९पैकी ४४ जागांवर विजय मिळवता आला होता.

पाच वर्षापूर्वी विधानसभेची पहिली निवडणूक लढवणा-या मनसेने १४३ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना १३च जागांवर विजय मिळवता आला होता.

 पक्ष  जागा लढवल्या  विजय  मतदानाची टक्केवारी
 काँग्रेस  १७०  ८२  २१.१ टक्के
 राष्ट्रवादी  ११३  ६२  १६.३७ टक्के
 भाजप  १४३  ४६  
 शिवसेना  १६९  ४४  १६.२६ टक्के
 मनसे  १४३  १३  ५.१७ टक्के

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version