Home Uncategorized असाध्य आजार बरे करण्याची ताकद गाईमध्ये : निरंजनकुमार वर्मा

असाध्य आजार बरे करण्याची ताकद गाईमध्ये : निरंजनकुमार वर्मा

0

भारत देशाची कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळख आहे. देशाची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्याच प्रमाणात कृषी उत्पादन वाढण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांची स्थापना केली.

भारत देशाची कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळख आहे. देशाची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्याच प्रमाणात कृषी उत्पादन वाढण्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठांची स्थापना केली. संशोधकांनी अन्नधान्य, फळांच्या विविध संकरित व संशोधित जाती निर्माण केल्या आहेत. या सर्व शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करत आहे. रासायनिक खतांमुळे अन्नधान्य व कडधान्यांचे उत्पादन वाढले.

शेतकरी कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ लागले, या सर्व गोष्टींच्या मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊन माणसाचे आयुर्मान घटत चालले आहे. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी पंचगव्य चिकित्साचा अवलंब करावा. गायीचे दूध, दही,लोणी,तूप व शेणापासून ऑक्सिजन निर्मितीमुळे मानवी जीवन निरोगी राहण्यास मदत होईल. पंचगव्य चिकित्साचा वापर शेतक-यांनी केल्यास निरोगी व दीर्घायुषी पिढी निर्माण होईल असा दावा पंचगव्य सिद्धाचार्य निरंजनकुमार वर्मा यांनी केला आहे.

युवा पिढीने गायीला समजले पाहिजे. गोमूत्र, शेण, दूध, दही, लोणी,तूप हे पदार्थ गायीमुळे मिळतात. गायीच्या शेणापासून नैसर्गिक शेती केली पाहिजे. शेणामध्ये २१ टक्के ऑक्सिजन असतो. ते शेण वाळवून जाळल्यास ४६.१० टक्के ऑक्सिजन निर्माण होतो. मनुष्य प्राण्याला प्राणवायू म्हणजेच महत्त्वाचा असतो. त्याचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराई नाहीशी होईल.

स्वातंत्र्यपूर्व काळात पशुधन ३४ कोटी होते. सध्या ते ३ कोटीवर आले आहे. दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीने एक गाय पाळून तिचे संवर्धन करण्याची वेळ आली आहे. शहरी भागात १४ टक्के ऑक्सिजन आहे. ग्रामीण व डोंगराळ भागात २१ टक्के ऑक्सिजन आहे. वातावरणात ऑक्सिजनची वाढ झाल्यास निरोगी समाज निर्माण होईल.

प्राचीन काळापासून गो-संवर्धन केले जात असल्याचे अनेक पुरावे आहेत. ऋषी व देवतांनी गो-संवर्धन करून दीर्घायुष्य मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत. संगणकाच्या युगात पारंपरिक पद्धतीच्या शेणखताचा वापर करण्यासाठी पंचगव्ये चिकित्सेचा अवलंब तरुण पिढीने करण्याची गरज आहे.

देशातील जनतेला आरोग्याच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी गो-संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. देशातील एकूण लोकसंख्येचा विचार करता १२ टक्के लोकांना विविध आजारांवर शासन दरवर्षी ६० लाख करोड रुपये खर्च करत आहे. उर्वरित ८८ टक्केलोकांवर शासन आरोग्यविषयी योजनांवर खर्चच करत नाही. यासाठी सर्व गोष्टींचा विचार करता १०० टक्के लोकांवर शासनाने आरोग्याविषयी खर्च करण्यासाठी किती करोड रुपये खर्च करावे लागतील याचा अंदाज घेणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून

गो-संवर्धन केल्यास आपल्याला ३५०० हजार इतके फॉम्र्युले गाईच्या अंगामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येकाने गाईला आईचा दर्जा दिला पाहिजे. गाईच्या शेणापासून निसर्गामध्ये २१ टक्केऑक्सिजन मिळतो.  सध्या सर्व देशभर प्रदूषण झाले आहे. मनुष्याला ऑक्सिजनयुक्त शुद्ध हवा मिळत नाही. त्यामुळे दरदिवशी १३०० लोक प्रतिदिनी श्वसनाच्या आजाराने व २५०० हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू पावत असल्याचे सांगितले.

देशातील ३० टक्के मुली व २५ टक्के तरुणांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून १९४७ पूर्वी भारत देशामध्ये ३२ करोड गाई होत्या. सध्यस्थितीत फक्त ३ करोड गाई शिल्लकआहेत. ३६० गाईंच्या प्रजातींपैकी सध्या ७० प्रजाती शिल्लक आहेत.

देशाला पुन्हा गो-संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. देशातील लोकांना अनेक आजारांपासून वाचविण्यासाठी गाईच्या शेण व दुधापासून बनवलेल्या सर्व वस्तूंची निर्मिती मोठया प्रमाणावर होणे गरजेचे आहे. कॅन्सर व अनेक असाध्य रोग बरे करण्याची ताकद गाईमध्ये आहे.

गेल्या ३० वर्षापूर्वी अमेरिका युरोपमध्ये गो-संवर्धन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदेशातील लोकांना गो संवर्धनाचे महत्त्व समजले आहे. परंतु भारत देशातील राज्यकर्त्यांना गो-संवर्धनाचे महत्त्व समजलेले नाही. सरकारने २०२०पर्यंत भारत देश निरोगी बनवण्याचे स्वप्न बाळगले आहे. ते सत्यात उतरण्यासाठी गो-संवर्धन करणे ही देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version