Home देश या राज्यांमध्ये होणार ‘सेमी फायनल’

या राज्यांमध्ये होणार ‘सेमी फायनल’

0

लोकसभा निवडणुकी पूर्वी होणा-या पाच राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल… 

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणा केली आहे. सध्या या पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तर दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तर राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दिक्षीत या सलग तिस-यांदा सत्तेत आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपचे डॉ. रमण सिंह यांचे सरकार आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. भाजपचा पराभव करुन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यापुढे पुन्हा सत्तेत परतण्याचे आव्हान आहे. ईशान्यकडील मिझोरममध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. राज्यात विरोधी पक्ष नसल्यासारखा आहे. २००८मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी ३२ जागा मिळाल्या होत्या.

या पाच राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल-

»मध्य प्रदेश– (सत्ताधारी- भाजप, मुख्यमंत्री- शिवराजसिंह चौहान)

गेल्या विधानसभा निवडणुकीत २३० पैकी १५२ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या होत्या. तर बहूजन समाज पक्षाला सात जागा मिळाल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष तर समाजवादी पक्षाला एक एक जागा मिळाली होती.


»दिल्ली- (सत्ताधारी- काँग्रेस, मुख्यमंत्री- शीला दिक्षीत)

दिल्ली विधानसभेतच्या ७० पैकी ४१ जागा काँग्रेसकडे आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडे २४ जागा आहेत.बहुजन समाज पक्षाकडे दोन तर लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि अपक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे.


»राजस्थान- (सत्ताधारी- काँग्रेस, मुख्यमंत्री- अशोक गेहलोत)

विधानसभेच्या २००पैकी १०२ जागा काँग्रेसकडे आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडे ७९ जागा आहेत. अपक्षांकडे १३ जागा, माकपकडे तीन तर जनता दल संयुक्त, समाजवादी पक्ष आणि लोकतांत्रिक समाजवादी पार्टी यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहेत.


»छत्तीसगड-(सत्ताधारी- भाजप, मुख्यमंत्री- डॉ. रमण सिंह)

गेल्या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने ५० जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ३८ जागांवर विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्षाने दोन जागा मिळवल्या होत्या.


»मिझोरम-(सत्ताधारी- काँग्रेस, मुख्यमंत्री-लालथन हावला)

मिझोरम विधानसभेत काँग्रेसचे ३२ सदस्य आहेत. मिझो नॅशनल फ्रन्टचे तीन तर एमपीसी आणि झोराम नॅशनल पार्टीकडे प्रत्येकी दोन जागा आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version