Home महाराष्ट्र कोकण अवैध व्यवसाय, गुन्हेगारीबाबत म गप्प का?

अवैध व्यवसाय, गुन्हेगारीबाबत म गप्प का?

0

कणकवली शहरामध्ये मटका,जुगार विनापरवाना दारू विक्री,अनैतिक धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत. या बद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना पोलिसांकडून अनैतिक धंदे कायम स्वरूपी बंद करण्यासाठी योग्य पाऊले का उचलली जात नाहीत.

कणकवली शहरामध्ये मटका,जुगार विनापरवाना दारू विक्री,अनैतिक धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत. या बद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असताना पोलिसांकडून अनैतिक धंदे कायम स्वरूपी बंद करण्यासाठी योग्य पाऊले का उचलली जात नाहीत.पोलिस खाते गप्प का? कणकवली शहर व तालुक्यातील अनैतिक धंदे व वाढती गुन्हेगारीला केव्हा आळा बसणार?असा सवाल सर्व सामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.

कणकवली शहरामध्ये विधवा महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली.  एका गरीब विधवा महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत या पाच तरूणांच्या टोळक्याने मध्यरात्री त्या महिलेवर  बलात्कार केला. या घटनेची फिर्याद त्या महिलेने पोलिसांना दिली.

तक्रारीची दखल कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गीताराम शेवाळे व अन्य सहकारी पोलिसांनी घेतली.त्या पाचही तरूणांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या कर्तव्यदक्षतेला कणकवली तालुक्याने सलाम दिला आहे. या घटने संदर्भात अनेक राजकीय नेते मंडळीनी हे प्रकरण दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.

मात्र त्याला न जुमानता त्या तरूणांना कठोर शिक्षा व्हावी अद्दल घडावी कारण अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत. ही पोलिसांची भूमिका आहे. या घटनेतील पाचही तरूणांवर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

पोलिसांनी या घटनेवर केलेली कारवाई बद्दल काँग्रेस पक्षाने या प्रकरणातील दोषींवर केलेल्या कारवाई बद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतिश सावंत,जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तर अशा विकृत प्रवृत्तीबद्दल मूक मोर्चा काढून निषेधही केला आहे. याप्रमाणेच अन्य अवैध व्यवसायांना आळा बसण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कणकवली शहराचे शहरीकरण झपाटयाने वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे शहरात घरफोडया,चो-या,मटका,जुगार,असे अवैध व्यवसाय वाढत आहेत. या सर्व अवैध धंदय़ांना पोलिसांनी अभय न देता कोणाचाही विरोध न जूमानता कारवाई करून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. तरच कणकवली शहरवासीयांना चांगले दिवस येतील.

काही तरूण  तरूणींना पैशाचे आमिष दाखवून आपल्या जाळयात ओढत आहेत. ईल क्लिप तयार करून ब्लॅकमेल करून तिला नाहक त्रास दिला जातो. अशा ध्प्रकारांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.अशा विकृतीला वेळीच आळा बसायला पाहिजे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version