Home महाराष्ट्र कोकण मेवा अलिबागमध्ये राज्यस्तरीय नाटय़स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अलिबागमध्ये राज्यस्तरीय नाटय़स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0

अलिबागमध्ये सोमवारी श्रावण धारा बरसत होत्या. त्याचबरोबर एकापेक्षाएक सरस गाण्यांच्या मधूर स्वरांनी अलिबागकर चिंब झाले हाते. बहारदार कार्यक्रमाने अलिबागकरांच्या श्रावणाची सांगता झाली.

अलिबाग – अलिबागमध्ये सोमवारी श्रावण धारा बरसत होत्या. त्याचबरोबर एकापेक्षाएक सरस गाण्यांच्या मधूर स्वरांनी अलिबागकर चिंब झाले हाते. बहारदार कार्यक्रमाने अलिबागकरांच्या श्रावणाची सांगता झाली. अमावास्येच्या दिवशी आलिबागमध्ये जणू चांदाचा कवडसाच पडला होता.  महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव आणि राज्यस्तरीय नाट्य स्पधेर्चा पारीतोषिक वितरण समारंभ आज अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाट्य रंगोत्सव हा समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला. विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यांच्या सादरीकरणाने येथील नाटय़रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अमोल बावडेर याने स्वरांकिता तू शाम सुंदरा , सुर निरागस हो ही गाणी सादर केली. संपदा माने हिने गायलेले हे सुरांनो चंद्र व्हा उपस्थित रसिकांची दाद मिळवून गेली. कवडसा चांदाचा पडला या लावणीवर प्रमिला लोदगेकर हिने सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला चारचाँद लावला. अलिबाग येथील जेएसएम व पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थानी लोकनृत्ये सादर केली. नांदी व गाऱ्हाण्याने सुरवात झालेल्या या कार्यक्रमाची सांगता भैरवीने करण्यात आली.

बालनाटय़, हिंदी, संस्कृत कार्यक्रमातील अभिनयाची रौप्यपदके, हौशी मराठी नाटय़ स्पधेर्तील अभिनय रौप्यपदके, संगीत आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील अभिनय रौप्यपदके, नैपथ्य व प्रकाश योजना, रंगभूषा व वेशभुषा, संगीत आणि नाट्यलेखन, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती या विभागांमध्ये एकूण १५९ पारितोषिकांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदीती तटकरे, आमदार पंडीत पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री निवेदिता सराफ, वैभव मांगले, डॉ. विश्वास मेहेंदळे, हेमंत एदलाबादकर, देवदत्त नागे, सुरेश गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते. अजिंक्य नलावडे आणि श्रद्धा पोखरणकर यांनी व जुई भागवत आणि दर्शन पाटील या विद्यार्थ्यांंनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास पारितोस्हिक विजेते कलावंत व स्थानिक अलिबागकर नाटय़रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version