Home देश अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी

अरविंदला पैकीच्या पैकी गुण – किरण बेदी

0

किरण बेदी यांनी आपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल टि्वटरवरुन अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य स्पर्धक असणा-या किरण बेदी यांनी आपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल टि्वटरवरुन अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

अरविंद तुझे अभिनंदन. तुला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. आता दिल्लीला एका वेगळया उंचीवर घेऊन जा. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवा असे बेदी यांनी टि्वट केले आहे.

किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभेची निवडणूक लढणा-या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. किरण बेदी यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना या निकालाला नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराशी जोडण्यास नकार दिला.

जेव्हा पक्ष जिंकतो तेव्हा तो सामूहिक विजय असतो. जेव्हा पराभव होतो तो एकटयाचा असतो. मी या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारते. पोलिस सेवेत असतानाही मी अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे असे बेदी म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल आणि माझ्यामध्ये सामना होता. आमच्या दोघांपैकी कोणी एक जिंकणार होता असे बेदी यांनी सांगितले. दिल्लीमध्ये भाजपाचा अत्यंत दारुण पराभव झाला असून, भाजपला दहाच्या आता जागा मिळतील अशी स्थिती आहे. स्वत:हा किरण बेदी भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणा-या क्रिष्णनगरमध्ये पहिल्या तीन फे-यांमध्ये पिछाडीवर होत्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version