Home महाराष्ट्र कोकण अन् त्यांनी केले नवागताचे स्वागत!

अन् त्यांनी केले नवागताचे स्वागत!

0

नवागताच्या जन्माने प्रत्येक जण आनंदून जातो. मग ते लहान बाळ असो वा घरातील पाळीव प्राण्याचं पिल्लू.. त्याचं इवलंसं रूप, त्याचे डोळे, त्याचा रंग या साऱ्याचं कोडकौतुक केलं जातं.

देवरुख – नवागताच्या जन्माने प्रत्येक जण आनंदून जातो. मग ते लहान बाळ असो वा घरातील पाळीव प्राण्याचं पिल्लू.. त्याचं इवलंसं रूप, त्याचे डोळे, त्याचा रंग या साऱ्याचं कोडकौतुक केलं जातं. घरात पाळलेल्या प्राण्यांच्या बाबतीत ही काळजी सगळे जण घेतील. पण रस्त्यावरच्या उनाड गुरांच्या बाबतीत ही काळजी फारच क्वचित नशिबात असते. देवरुखात मात्र हा माणुसकीचा झरा पाझरला एका गायीच्या वासरासाठी!

रस्त्यावरील उनाड गुरे ही सर्वासाठी डोकेदुखीच असते. अनेक मोकाट गुरांबाबत नागरिकांची नेहमीच तक्रार असते. मात्र, येथील पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गाने एका उनाड गायीच्या पाडसाच्या जन्माचं स्वागत करत आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवलं. ही गाय नेहमीप्रमाणे फिरत असताना सकाळी पंचायत समितीच्या आवारात तिने एका पाडय़ाला जन्म दिल्याचे लक्षात येताच कर्मचा-यांनी तातडीने पशुवैद्यकीय कार्यालयातील उपचारतज्ज्ञ जयसिंग कोळी यांना बोलावले.

त्यांच्या सहाय्याने दोन्ही जीवांची योग्य ती काळजी घेतली. यानंतर त्या गायीला पाडय़ासह कार्यालयाजवळील दवाखान्याच्या परिसरात ठेवले. डॉ. अभिजीत कसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गायीसह पाडय़ाची तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत या गायीच्या मालकाचा पत्ता न लागल्याने या गायीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version