Home ताज्या घडामोडी अधिकारी, कर्मचा-यांना ‘बेस्ट’धोका

अधिकारी, कर्मचा-यांना ‘बेस्ट’धोका

0

नादुरुस्त इमारतींतील रहिवाशांचा जीव टांगणीला

मुंबई- अंधेरी पूल दुघर्टनेनंतर संबंधित सरकारी व निमशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या असे वाटले होते. मात्र बेस्ट उपक्रमाची झोप अद्याप पूर्ण झालेली नाही. बेस्ट उपक्रमातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी असलेल्या वसाहतींची दुरवस्था झाली आहे. बेस्ट उपक्रमाकडे पैशाचा तुटवडा असल्याची ओरड प्रशासनाकडून करण्यात येते. प्रशासन व बेस्ट उपक्रमातील सत्ताधा-यांच्या बेजबादारपणामुळे अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत जीवन जगत आहेत.

मायानगरी मुंबईत पावलोपावली धोका आहे. कधी रस्ता खचणे, इमारत अथवा छत कोसळणे, झाड कोसळणे हे धोके मुंबईकरांच्या पाचविलाच पूजले आहेत. मात्र एखादी दुघर्टना घडल्यानंतर संबंधित यंत्रणा असा बनाव करतात, की भविष्यात कुठलीच दुघर्टना होणार नाही. सगळ्याच यंत्रणांबरोबर बेस्ट उपक्रम काही नामानिराळा नसल्याचे स्पष्ट दिसून येते. मुंबई शहर, पूर्व, पश्चिम उपनगरात बेस्ट उपक्रमातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी वसाहती बांधण्यात आल्या आहेत. जवळपास ५,४३८ वसाहती बांधण्यात आल्या असून यापैकी अनेक वसाहतींची वयोमर्यादा ४० शी पार झालेली आहे. त्यामुळे अनेक वसाहती धोक्याच्या पातळीवर उभ्या असून अधिकारी व कर्मचा-यांसाठी ‘बेस्ट’ धोकाच आहे.

सध्या बेस्ट उपक्रमाकडे पैशाची चणचण आहे. त्यामुळे कधी कधी कर्मचा-यांना वेळेवर पगार देणे शक्य होत नाही. परंतु बेस्ट उपक्रमाच्या वसाहतीत राहणा-यांची योग्य काळजी घेतली जाते. तसेच वेळोवेळी दुरुस्तीही केली जाते. मानखुर्द येथील धोकादायक इमारत काही महिन्यांपूर्वीच खाली करण्यात आली आहे. तर सांताक्रूज येथील ६ धोकादायक इमारती तोडण्यात आल्या आहेत. या इमारतींचे पुन्हा नव्याने काम हाती घेण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या एकूण वसाहती
एकूण कर्मचारी वसाहत- ४,६२५
एकूण अधिकारी वसाहत – ८१८

पालिकेने पैसे दिले पाहिजेत  
बेस्ट उपक्रमातील कर्मचा-यांसाठी असलेल्या इमारतींचे ऑडिट पालिका करते. पालिकेने इमारत धोकादायक जाहीर केल्यास ती इमारत बेस्ट उपक्रमाने त्वरित रिकामी केली पाहिजे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे की, बेस्ट उपक्रमाला पैशांची मदत केली पाहिजे. पालिका आयुक्तांकडे विरोधी पक्षनेता म्हणून मागणी करतो.
– रविराजा, विरोधी पक्षनेता,
बेस्ट समिती

या संदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना संपर्क केला असता, त्यांनी मेसेज करण्यास सांगितले. मेसेज केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version