नवी मुंबई : 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस

Share

नवी मुंबई : कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून चार दिवसात 36356 मुलांचे लसीकरण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनाही ”प्रिकॉशन डोस” दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत 27 डिसेंबर रोजीच तातडीने विशेष बैठक घेत या लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केलेले आहे.

त्यानुसार 10 जानेवारीपासून दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झालेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना “प्रिकॉशन डोस” दिला जाणार आहे. याकरिता महानगरपालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालये आणि तुर्भे येथील माता बाल रुग्णालय त्याचप्रमाणे 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत हा प्रिकॉशन डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जे आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनी 12 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला असेल ते लाभार्थी 10 जानेवारी रोजी प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असतील.

नवी मुंबई महानगरपालिकेची 4 रुग्णालये व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना कोव्हीड लसीचा प्रिकॉशन डोस विनामूल्य दिला जाणार असून पात्र लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेऊन कोव्हीड पासून अधिक संरक्षण प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.

Recent Posts

DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय…

3 mins ago

CBSE Board वर्षातून दोनदा परीक्षा घेणार; कसा असेल हा नवा नियम?

जाणून घ्या सविस्तर मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा…

2 hours ago

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण? रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED)…

2 hours ago

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)…

3 hours ago

Shashikant Shinde : १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल!

शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…

3 hours ago

Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत…

4 hours ago