Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीमनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासाठी नाशिक सज्ज

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यासाठी नाशिक सज्ज

उपोषणकर्ते मराठा बांधवांना आज करणार मार्गदर्शन

नाशिक:मराठा आरक्षणातील लढाऊ योद्धा म्हणून ओळख असलेल्या तसेच मराठ्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मराठवाड्यातील आंतरवेली सराटी येथील मनोज जरांगे पाटील येत्या रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर मराठा उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपस्थित समुदायाला जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी जरांगे पाटील यांचे स्वागत वारकरी टाळ मृदूंगाच्या गजरात करणार आहेत.यावेळी शिवव्याख्याते हभप कृष्णा महाराज धोंडगे (दुगावकर)यांचे मराठा आरक्षण विषयावर कीर्तन होईल.या वेळी जिल्ह्यातील मराठा बंधू भगिनींनी,शेतकरी,विद्यार्थी, बेरोजगार, युवकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज नाशिक जिल्हा संयोजित साखळी उपोषणकर्त्यांच्या वतीने संयोजकांन केले आहे.

मराठवाड्यातील आंतरवेली सराटी या छोट्या गावावlतील सामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील या युवकाने १७ दिवस अन्नपाणी सोडून राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत व मराठ्यांच्या वर्तमान व भविष्यातील पिढ्या वाचवण्यासाठी केलेल्या उपोषणास अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान जरांगे पाटील यांनी सुरू ठेवलेल्या साखळी उपोषणास राज्यभरात अनेक जिल्हे तालुक्यात साखळी उपोषणे सुरू झालीत, नाशिकलाही मध्यवर्ती ठिकाणी सकल मराठा समाज नाशिकच्या वतीने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू झाले या उपोषणात रात्रंदिवस बसलेल्या

नाना बच्छाव या तरुणाच्या सहवासात अनेक जण उपोषणात बसले,तर अनेक सामाजिक,राजकीय,विविध गाव,संघटना,व गावांनी,वारकरी व शेतकरी संघटनांनी,महिला भगिनी,विद्यार्थी,विविध समुदायांनी उपोषणस्थळी येऊन लेखी पाठिंबा दिला.याठिकाणी येत्या रविवारी ८ ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील सायंकाळी ६ वाजता भेट देणार आहे,या दृष्टीने नाशिक जिल्हा,सकल मराठा समाजाचे वतीने पूर्ण नियोजन करण्यात आलं आहे,मराठा आरक्षणाचे नायक मनोज जरांगे पाटील हे वारकऱ्यांच्या स्वागतानंतर प्रथम नाशिकच्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज याना पुष्पहार अर्पण करतील.त्यानंतर ते येथील आवारातच ते जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील. दरम्यान मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा निरंतर राहील असा निर्धार ही सकल मराठा समाज वतीने करण्यात येत आहे.दरम्यान जरांगे पाटील दौऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी असें आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -