Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Railway : रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पश्चिम मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

Mumbai Railway : रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पश्चिम मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

‘या’ रेल्वे गाड्या रद्द

मुंबई : विरार-डहाणु मार्गातील वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधण्यात येत आहे. यासाठी स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे पश्चिम रेल्वेने दोन दिवस मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. त्याचबरोबर या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही ट्रेनला फटका बसणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरार-डहाणु मार्गादरम्यान वैतरणा नदीच्या जवळ स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे विरार-वैतरणा सेक्शनमधील पुल क्रमांक ९० वरील पीएससी स्लॅब बदलण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच गुरुवारी २४ मे रोजी रात्री १०.५० वाजल्यापासून ते शुक्रवारी २५ मे रोजी पहाटे ४.५० पर्यंत असणार आहे. यादरम्यान, पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

‘या’ गाड्या असणार रद्द

२४ मे रोजी रात्री ९.२० वाजता विरारहून सुटणारी विरार-डहाणू आणि १०.४५ वाजता डहाणू मार्गावरुन सुटणारी विरार लोकल रद्द राहणार आहे.

‘या’ गाड्या अंशतः रद्द

  • ट्रेन क्र १९४२६ नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस बोईसरपर्यंतच धावेल. बोईसर आणि बोरिवली स्थानकादरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे.
  • ट्रेन क्र ०९०९९० संजन-विरार MEMU डहाणू रोडपर्यंत धावेल आणि डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहे.
  • ट्रेन क्र ०९०८९ विरार-संजन मेमू विरार आणि वाणगाव स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे. दरम्यान वाणगाव रोड ते संजन दरम्यान धावेल.
  • ट्रेन क्र ०९१८० सुरत-विरार पॅसेंजर डहाणू रोडपर्यंतच धावणार आहे. डहाणू रोड आणि विरार स्थानकादरम्यान अंशत रद्द केली जाणार आहे.
  • ट्रेन क्र १९१०१ विरार-भरुच पॅसेंजर विरार डहाणू रोड स्थानकादरम्यान अंशत रद्द राहील. तसंच, डहाणू रोड आणि भरूच स्थानकादरम्यान धावेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -