Mumbai Metro : ‘मेट्रो २ अ’च्या स्थानकांचे पुन्हा ऑडिट होणार!

Share

मुंबई : मेट्रो ‘२ अ’ आणि ‘७’ ही मेट्रोसेवा (Mumbai Metro) सुरू झाल्यापासून वर्षभराच्या आतच या स्थानकांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी मंडपेश्वर मेट्रो स्थानकाबाहेरील काचेचे पॅनल कोसळून एका रिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्व मेट्रो स्थानकांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो ‘२ अ’ च्या एकूण १७ स्थानकांपैकी ३ स्थानकांवर दर्शनी भागात असलेल्या काचेच्या फलकांचा वापर करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ज्या स्थानकाच्या दर्शनी भागात काचेचे पॅनल वापरण्यात आले आहेत, त्या ३ स्थानकांचे ऑडिट करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या आत ऑडिट पूर्ण होण्याची शक्यता आहे. आढावा घेऊन इतर ठिकाणी कार्यवाही केली जाईल.

दरम्यान, आयसी कॉलनी मेट्रो स्थानकाच्या दर्शनी भागातील काचेचे पॅनल काढून टाकण्यात येत आहेत. हा सर्व खर्च कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Tags: mumbai metro

Recent Posts

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

22 mins ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

1 hour ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

2 hours ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

6 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

6 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

9 hours ago