२७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला होणार मतदान

Share

मुंबई (हिं.स.) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील.

शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

नाशिक : बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६.

धुळे : धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १.

जळगाव : रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६.

अहमदनगर : अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३.

पुणे : हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २.

सोलापूर : सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- ३, मोहोळ- १, माढा- २, करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४.

सातारा : कराड- ९ आणि फलटण- १.

सांगली : तासगाव- १.

औरंगाबाद : औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २.

बीड: बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५.

लातूर : रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- ४.

उस्मानाबाद : तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १.

परभणी : सेलू- ३.

बुलढाणा : खामगाव- २ आणि मलकापूर- ३. एकूण- २७१.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

19 mins ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

3 hours ago

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

4 hours ago

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

4 hours ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

5 hours ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

8 hours ago