Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीPrivate travels accident : अपघात टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सना एमएसआरटीसीच्या 'या' विशेष सूचना

Private travels accident : अपघात टाळण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सना एमएसआरटीसीच्या ‘या’ विशेष सूचना

दिवाळीत प्रवाशांची लूट करणार्‍यांनाही देणार दणका

मुंबई : गेल्या काही दिवसांत खाजगी ट्रॅव्हल्सच्या (Private Travels) अपघाताच्या घटनांचे (Accident news) प्रमाण वाढले आहे. आरामदायी आणि सुखकर प्रवास व्हावा म्हणून प्रवासी अधिकचे पैसे खर्च करुन खाजगी ट्रॅव्हल्स मधून जाणे पसंत करतात. पण याच गाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने (Maharashtra State Road Transport Corporation) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात आपत्कालीन परिस्थितीत खाजगी बसमध्ये सूचना देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्सकडून आकारण्यात येणार्‍या भरमसाठ तिकीट किंमतीला आळा घालण्यासाठी देखील परिवहन विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या भाड्यापेक्षा कमाल दीडपट भाडं खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना घेता येईल, त्यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लूट करण्याचा खाजगी ट्रॅव्हल्सचा डाव परिवहन विभागाने हाणून पाडला आहे. ही भाडे निश्चिती मोटार ॲक्ट नुसार करण्यात आली असून ती एसटी भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक आहे. म्हणजेच एसटीचे भाडे २०० असेल तर खाजगी बस चालकांना यासाठी ३०० रुपये आकारता येतील.

नागपूरचे (Nagpur) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातील माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे. बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. तसेच विमान प्रवासात ज्या पद्धतीने एअर होस्टेस (Air Hostess) आपत्कालीन परिस्थितीत (Emergency cases) प्रवाशांनी काय करावे याची सूचना प्रवाशांना देते, तशाच पद्धतीच्या सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -