Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीIgatpuri news : भावली दुर्घटना ताजी असतानाच इगतपुरीमध्ये विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू!

Igatpuri news : भावली दुर्घटना ताजी असतानाच इगतपुरीमध्ये विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू!

विहिरीला कठडा नसल्याने बुडल्याची शक्यता

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरणावर (Bhavali Dam) फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा काल बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता इगतपुरीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आला. या दोघी मायलेकी असल्याचे समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका नवनाथ दराणे (२३ वर्षे) आणि वेदश्री नवनाथ दराणे (३ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मायलेकींचे नाव आहे. विहिरीला कठडा नसल्यामुळे विहिरीजवळ गेलेली बालिका विहिरीत पडली असावी व बालिकेला वाचवण्यासाठी आईने धाव घेऊन उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

या दोघीही येथून जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -