Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणआमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी गरजू विद्यार्थीनींना दुसऱ्या टप्प्यातील शंभर...

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी गरजू विद्यार्थीनींना दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील गरजू मुलींना शाळेत जाण्या–येण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने आज महाराष्ट्र दिनी दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप केले.

आमदार नितेश राणे यांनी दुसऱ्या टप्प्यात १०० शाळकरी मुलींना आज महाराष्ट्र दिनी कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर मोफत सायकल वाटप केले. सायकल मिळताच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

यापूर्वी ११० सायकल मोफत वितरित केलेल्या होत्या. जसजशी मागणी आणि गरज असेल त्या प्रमाणे मुलींना या सायकल दिल्या जात आहेत.

सायकल हातात आली आणि एक रपेट मारत शाळकरी मुलींनी आपला आनंद व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -