Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीMissing case : गळ्यातील लॉकेटमध्ये क्यूआर कोड! हरवलेला दिव्यांग मुलगा सहा तासांतच...

Missing case : गळ्यातील लॉकेटमध्ये क्यूआर कोड! हरवलेला दिव्यांग मुलगा सहा तासांतच परतला घरी

तंत्रज्ञानामुळे कुलाबा पोलिसांना मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात मिळाले यश

नेमकं काय घडलं?

मुंबई : हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा (Technology) वापर इतका वाढला आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वेळ आली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि किती करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. एका दिव्यांग (Intellectually Challenged) मुलाच्या पालकांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आणि त्यांचा हरवलेला मुलगा (Missing child) अवघ्या सहा तासांत त्यांना परत मिळाला. मुंबईच्या वरळी भागात राहणारा हा दिव्यांग मुलगा खेळता खेळता बसमध्ये चढला आणि हरवला. मात्र त्याच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमध्ये असलेल्या क्यूआर कोडमुळे (QR code) पोलिसांना काही वेळातच त्याच्या पालकांपर्यंत पोहोचता आलं.

ही घटना कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची माहिती देताना कुलाबा पोलीस ठाण्याने सांगितले की, विनायक कोळी असे या मुलाचे नाव आहे. वरळी परिसरातून खेळत असताना विनायक बसमध्ये बसला आणि बसमध्येच निघून गेला. तो हरवला असल्याचे समजताच कंडक्टरने पोलिसांशी संपर्क साधला. कंडक्टरने सांगितले की बसमध्ये एक मुलगा बसला आहे, जो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो फक्त त्याचे नाव सांगू शकतो. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

यानंतर पोलिसांनी त्याच्या लॉकेटमध्ये क्यूआर कोड पाहिल्यानंतर त्यांनी तो स्कॅन केला. मुलाच्या गळ्यात असलेल्या लॉकेटचा क्यूआर कोड स्कॅन केला असता घरातील सदस्यांचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. तपशीलांची पुष्टी केल्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी पुढे सांगितले की, हा मुलगा वरळी येथून दुपारी ३ वाजता बेपत्ता झाला होता. रात्री आठच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने त्याला पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.

तंत्रज्ञानाने बजावली महत्त्वाची भूमिका

लॉकेटबद्दल डेटा इंजिनियर अक्षय रिडलान यांनी सांगितले की, आपल्या मुलाला अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतून वाचवण्यासाठी त्यांनी हे QR कोड लॉकेट मुलाच्या गळ्यात घातले होते. ज्यामध्ये मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी माहिती असलेली लिंक दिली आहे. या मुलाला पुन्हा कुटुंबाशी जोडण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -