Monday, May 20, 2024
Homeक्रीडामीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मीराबाई चानूची ‘गोल्डन’ कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई चानूने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे ८४ किलो वजन उचलले. मीराबाई चानूने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या ८८ किलो वजन उचलले आणि ऑलिम्पिकमधला तिचा रेकॉर्ड मोडला आहे.

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक-२०२२ मध्ये ४९ किलो वजनी गटात भारताला पहिले रौप्य पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मीराबाई दुसरी खेळाडू आहे. त्यांच्या आधी कर्णम मल्लेश्वरी यांनी २००० मध्ये ही कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.

२०१४ मध्ये झालेल्या या खेळांमध्ये तिला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. याशिवाय चानूने २०१७ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई चानूचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. ती मणिपूरची राजधानी इंफाळमधील नॉन्गपोक काकचिंग गावातून आली. तिचे हे गाव तिच्या अकादमीपासून २५ किलोमीटर अंतरावर होते आणि अशा परिस्थितीत ती रोज ट्रकचालकांसोबत सराव करायला येत होती.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदके मिळवली आहे. सर्वात आधी ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवले. त्यानंतर आता ६१ किलो वजनी गटात एकूण २६९ किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांना गवसणी घातली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -