Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीPolitics : मंत्री गावितांचे समर्थक दुखावले! पालकमंत्रीपदामुळे मंत्री अनिल पाटील यांची नंदुरबारच्या...

Politics : मंत्री गावितांचे समर्थक दुखावले! पालकमंत्रीपदामुळे मंत्री अनिल पाटील यांची नंदुरबारच्या राजकारणात एन्ट्री

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने अचानक पालकमंत्री पदामध्ये फेरबदल घडवले. यामुळे नंदुरबार येथील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. या फेरबदलामुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेचे आमदार आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांना आदिवासी विकास मंत्री पद मिळाले. त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पद देखील पर्यायाने त्यांच्याकडे आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट या तीन पक्षात सत्ता पदांचा समतोल साधण्यासाठी सध्या कसरत चालली आहे. त्या परिणामातून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांना मिळाले आहे.

अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता एक महिन्यापूर्वीपासून वर्तवली जात होती. अजित दादा यांचा झालेला नंदुरबार दौरा आणि पाठोपाठ दोन वेळेस अनिल पाटील यांचे झालेले दौरे त्या चर्चेला कारणीभूत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -