Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी कर्णधार पांड्याने कोणाला ठरवले जबाबदार

MI vs RR: मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवासाठी कर्णधार पांड्याने कोणाला ठरवले जबाबदार

मुंबई: मुंबई इंडियन्सला(mumbai indians) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. मुंबईने तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर वानखेडेवर ६ विकेटनी गमावला. आतापर्यंत हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला एकही विजय मिळवता आलेला नाही.

हार्दिकला कर्णधार बनवण्यामुळे आधीच चाहते नाराज होते आणि आता संघाच्या कामगिरीमुळे ते अधिकच निराश झाले आहे. दरम्यान, पराभवाची हॅटट्रिक लावल्यानंतर मुंबईच्या कर्णधाराने कोणाला जबाबदार ठरवले आहे?

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ही एक कठीण रात्र. आम्हाला हवी तशी सुरूवात मिळाली नाही. मला पलटवार करायचा हता. आम्ही १५०-१६० बनवण्याच्या चांगल्या स्थितीत होते. मात्र माझ्या विकेटने त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज होते. ठीक आहे आम्ही अशा विकेटची अपेक्षा केली नव्हती.

अनेकदा रिझल्ट चांगलाच लागेल असे नाही. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही अधिक चांगले करू शकतो. मात्र आम्हाला अधिक अनुशासित होण्याची गरज आहे आणि खूप आक्रमक खेळ करावा लागेल.

वानखेडे स्टेडियममध्ये खेळवलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यास उतरलेल्या मुंबईच्या संघाला २० षटकांत ९ विकेट गमावत केवळ १२५ धावाच करता आल्या. संघाचे सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्राविस सामील होते. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांना ३० धावांचा आकडा पार करता आला होता. हार्दिकने ३४ तर तिलकने ३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानने १५.३ षटकांतच ४ विकेट गमावत विजय आपल्या नावे केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -