Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai police : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट...

Mumbai police : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

पुणे पोलिसांनाही आला होता धमकीचा मेसेज

मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला (Mumbai Traffic Police Control Room) धमकीचा एक मेसेज (Threat message) आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून हा मेसेज पाठवण्यात आला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

याआधी पुणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्ब शोधक पथके देखील पुना हॉस्पिटलमधे तैनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई पोलिसांना धमकीचे मेसेज येण्याची ही पहिली वेळ नव्हे. मात्र मुंबई पोलीस आपल्या सतर्कतेने काही तासांच्या आतच या आरोपींच्या मुसक्या आवळतात आणि संभाव्य धोका टाळतात. यावेळेसही मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून कसून तपास सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -