Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमौलवीने अल्पवयीन विद्यार्थाला केली अमानुष मारहाण

मौलवीने अल्पवयीन विद्यार्थाला केली अमानुष मारहाण

तीन महिन्यानंतर व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

भिवंडी: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाला अमानुषपणे केलेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. केवळ अभ्यास व्यवस्थित करत नव्हता म्हणून एका मौलवीने मदरशात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली आहे. तीन महिन्यापुर्वी झालेल्या या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच मारहाण करणाऱ्या मौलवीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन पीडित विद्यार्थी भिवंडी शहरातील मिल्लत नगर भागात असलेल्या दारुल उलूम हसनैन करीमॅन दिनी मदरशात शिक्षण घेत आहे. ही घटना २४ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली. तो नेहमीप्रमाणे मदरशात सकाळच्या सुमारास गेला होता. त्यावेळी आरोपी मौलवीने त्याला पाठांतर करण्यास सांगितले. मात्र, पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याचे कारण देऊन, या मौलवी शिक्षकाने त्याला काठीने अमानुष मारहाण केली. त्याने काठीने त्याला ७० सेकंदात ७० फटके मारले. ही मारहाण इतकी जबर होती की त्याच्या अंगावर जखमा झाल्या. मात्र हा धक्कादायक प्रकार त्यावेळी दडविण्यात आला. यावेळी या जखमी विद्यार्थावर उपचारही सुरु होते. खरंतर या घटनेच्या वेळी मदरशातील आणखी तीन जणही तेथे उपस्थित होते. त्या तिघांनीही या मौलवीला थांबवण्याची अथवा अडवण्याची तसदी घेतली नाही.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच ही घटना समोर आली आणि त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे २६ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी मिल्लत नगर मधील दर्गा ट्रस्टी नूरअली हसन अली सय्यद (वय ६३) यांच्या तक्रारीवरून मौलवी शिक्षकाविरोधात भादंवि २०१५चे कलम ७५ (मुलांची काळजी व संरक्षण) तसेच ३२४, ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -