Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMarathi Boards : कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलला मनसेचा दणका!

Marathi Boards : कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलला मनसेचा दणका!

मराठी पाट्या लावण्याची मुदत उलटून गेल्याने अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत (Marathi Boards) असाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला काही अमराठी व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या व्यापार्‍यांना दणका देत २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत पाट्या लागल्याच पाहिजेत, असा निर्णय दिला होता.

यानंतर ही मुदत उलटूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी पाट्या नसल्याचे चित्र आहे. यामुळेच मनसेने आठवडाभरापूर्वी ‘पाट्या लागल्या नाहीत, तर मनसेचा खळखट्याक’, असा मजकूर असलेले बॅनर्स लावत आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानुसार कुर्ल्यातील एका मॉलमध्ये मराठी पाटी न लावल्याने मनसेने आंदोलन सुरु केलं आहे. फिनिक्स मार्केटसिटी मॉल (Phoenix marketcity Kurla) या ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला दोन महिने झाले आहेत. पण कुर्ल्यातील हा मॉल जाणुनबूजून आदेशाचे पालन करत नाही. मराठी भाषेचा ते सन्मान करत नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा निषेध नोंदवायला आम्ही इथे आलो आहोत आणि आता आम्ही मॅनेजमेंटसोबत मनसे स्टाईलने चर्चा करु. जोपर्यंत ते मराठी पाटी लावणार नाहीत तोपर्यंत कोणालाच मॉलमध्ये जाऊ देणार नाही’, अशी भूमिका मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २५ नोव्हेंबरलाच महाराष्ट्रात सर्वत्र मराठी पाट्या लावणे आवश्यक होते. अमराठी पाट्यांविरोधात आजच कारवाई सुरु होणार होती. मात्र, आज सुटीचा दिवस असल्यामुळे कारवाई उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेने आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. मॉलच्या आतमध्ये शिरुन व्यवस्थापकांना जाब विचारणार, असा निर्धार मनसैनिकांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -