Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीआंबा महाग आहे, चिंता नको; आधी खा, नंतर पैसे द्या!

आंबा महाग आहे, चिंता नको; आधी खा, नंतर पैसे द्या!

व्यापारी विकतो ईएमआयवर 'हापूस' आंबा

पुणे : देशात फळांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकाने हापूस आंब्याची विक्री वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे. पुण्यातील एक व्यापारी अल्फोन्सो आंबा चक्क मासिक हप्त्यावर (ईएमआय) विक्री करत आहे. आंब्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन व्यापाऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी सांगितले की, हंगामाच्या सुरुवातीला आंब्याचे दर नेहमीच जास्त असतात. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हप्त्यांवर विकत घेता येतात तर आंबा का नाही. राज्यातील कोकण विभागातील देवगड आणि रत्नागिरी येथील अल्फोन्सो अर्थात ‘हापूस’ आंबा किरकोळ बाजारात सध्या १०० ते १३०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.

सणस यांनी दावा केला की, त्यांचा हा ईएमआयवर आंबे विकणारा देशातील पहिला दुकान आहे. सणस यांच्या आउटलेटवरून ईएमआयवर फळे खरेदी करण्याची प्रक्रिया मोबाईल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा १२ महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. ही योजना ५,००० रुपयांच्या किमान खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सणस यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -