विधान परिषदेसाठी आज ‘मैदान-ए-जंग’

Share

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून, सोमवारी २० जून रोजी विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीत ‘मैदान-ए-जंग’मध्ये कोण बाजी मारणार, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या जागांसाठी अपक्षांना आपलेसे करून दुसरी जागा जिंकून आणण्याची किमया दाखविणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत उभे राहिलेल्या पाचही भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कौशल्य पणाला लावतील आणि पाचजणांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडेल, असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.

या आधी विधानसभेच्या आमदारांच्या मतांवर निवडून जाणाऱ्या राज्य सभेची निवडणूक अटीतटीची झाली होती. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असताना शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक हे निवडून आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. विशेष म्हणजे अपक्षांबरोबर स्वपक्षातील सत्ताधारी आमदारांकडे अडीच वर्षांत लक्ष देणाऱ्या ठाकरे सरकारवर निधी वाटपावरूनही नाराजी आहे.

आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी, आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले.

देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरणार किंगमेकर?

भाजपच्या पाचव्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी २२ मतांची आवश्यकता आहे. मात्र विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतीने आमदार मतदान करणार असल्याने, भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज्यसभेत भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराचा विजय

देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणल्याने, विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच भाजप उमेदवार निवडून येतील. राज्यातील आघाडी सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची भाजपला साथ मिळाली तर देवेंद्र फडणवीस पुन्हा किंगमेकर ठरणार आहेत.

११ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत

भाजप – प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस – रामराजे नाईक – निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेना – सचिन आहीर, आमशा पाडवी

Recent Posts

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

2 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

2 hours ago

Rohit Sharma: आयुष्यात आधीही मी…आयपीएलमध्ये कर्णधारपद घेतल्यानंतर रोहित पाहा काय म्हणाला…

मुंबई: या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४साठी आधीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता…

4 hours ago

Food Tips: ही ५ फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी

मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती…

4 hours ago

“भारत जोडो यात्रेचा समारोप ४ जूनला काँग्रेस ‘ढूंढो’ यात्रेने होईल”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात बरेली : काँग्रेस पक्षाचे 'राजपुत्र' राहुल गांधी यांनी 'भारत…

4 hours ago

“शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी?

फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवारांचा सवाल पुणे : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी,आम्ही केली की गद्दारी?…

5 hours ago