Sunday, May 19, 2024
Homeदेशमहादेव अ‍ॅप घोटाळ्याचा मास्टरमाईंड सौरभ चंद्राकार दुबईत नजरकैद, भारतात आणण्याची तयारी

महादेव अ‍ॅप घोटाळ्याचा मास्टरमाईंड सौरभ चंद्राकार दुबईत नजरकैद, भारतात आणण्याची तयारी

नवी दिल्ली: महादेव ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपचा(mahadev online gaming app) प्रोमोटर सौरभ चंद्राकरबाबत(saurabh chandrakar) मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपचा मास्टरमाईं सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैद करण्यात आले आहे. यासोबतच त्याला भारतात आणण्याचा मार्ग साफ झाला आहे.

असे सांगितले जात आहे की, आरोपी सौरभविरोधात ईडीच्या अनुरोधानंतर रेड कॉर्नर नोटीसवर संयुक्त अरब अमिरातने कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यूएईच्या अधिकाऱ्यांनी दुबईत सौरभ चंद्राकर यांच्या निवासस्थानी टाळे ठोकत त्याला नजरकैद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभला घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण यामुळे तो पळून जाऊ शकतो. यूएईच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि भारतीय अधिकाऱ्यांकडून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

भारतात छत्तीसगडसह विविध मोठ्या राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये महादेव बेटिंग अ‍ॅपचे तब्बल ३० कॉल सेंटर खोलण्यात आले होते. या कॉल सेंटरला बेकायदेशीररित्या एक साखळी बनवून अतिशय हुशारीने चालवले जात होते. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोन जवळचे अनिल दम्मानी आणि सुनील दम्मानीच्या मदतीने भारतात ऑपरेट करत होते. प्रत्येक ब्रांचला सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल फ्रेंचायझीच्या रूपात विकत होते.

महादेव बेटिंग अ‍ॅपमध्ये रवी उप्पल केवळ सौरभ चंद्राकरचा उजवा हातच नाहीये तर पार्टनरही आहे. संपूर्ण देशभरात १२०० ब्राँच आहेत आणि असा दावा केला जात आहे की दर महिन्याची दोन्ही आरोपींची कमाई ९० कोटी आहे. असे म्हटले जात आहे की महादेव अ‍ॅप प्रोमोट करण्यासाठी अनेक मोठे बिझनेसमन आणि बॉलिवूड स्टार्स यांच्या संपर्कात होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -