Friday, May 17, 2024
Homeदेशरशियाचे Luna-25 कोसळल्याने चंद्रावर पडला ३३ फुटाचा खड्डा

रशियाचे Luna-25 कोसळल्याने चंद्रावर पडला ३३ फुटाचा खड्डा

नवी दिल्ली : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने रशियाच्या फेल झालेल्या चंद्र मोहिमेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दाखवण्यात आले आहे की रशियाचे चांद्र मिशन लुना २५ कोसळण्याआधी आणि नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर काय बदल झालेत. यात तुम्हाला चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेला खड्डा दिसतो.

रशियाचे लुना २५ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ कोसळले. हे यान आपल्या ठरवलेल्या वेगापेक्षा अधिक वेगात होते. यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. जर ते कोसळले नसते तर ४७ वर्षानंतर रशियाने चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्याचे यश मिळवले असते.

नासाच्या लुनर रिकॉन्सेस ऑर्बिटरने लुना २५यानाच्या क्रॅश साईटचे फोटो घेतले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर नवा क्रेटर दिसत आहे. जे लुना २५ आदळल्याने तयार झाले आहे. नासाने ट्वीट करत सांगितले की या क्रेटरचा व्यास १० मीटर इतका आहे. म्हणजेच साधारण ३३ फूट. हा नैसर्गिक पद्धतीने बनलेला खड्डा नाही.

यान कोसळल्यानंतर रशियाने या अपघाताच्या तपासासाठी नवी समिती स्थापन केली. यामुळे यान कोसळण्यामागचे खरे कारण समजेल. अनेकदा बऱ्याचदा चांद्र मोहीम अयशस्वी होतात. मात्र रशियाची ही चांद्र मोहीम त्यांच्या सन्मानाला पोहोचलेली ठेच आहे.

रशियाने लुना २५ हे यान ११ ऑगस्टला सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी लाँच केले होते. हे यान २१ अथवा २२ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र त्याआधीच हे यान कोसळले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -