Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजप्रेमाचा फास

प्रेमाचा फास

अॅड. रिया करंजकर

समाजमाध्यमात आज अशा काही घटना घडत असतात. त्याचा परिणाम नकळत कुटुंबावर आणि समाजावर होत चाललेला आहे. जेवढा समाज प्रगतिपथावर आहे, तेवढेच त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. आजची तरुण पिढी विचाराने, राहणीने फार पुढे गेलेली आहे. पण त्यांच्या वागणुकीने किंवा त्यांना मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे काही वेळा त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत.

रागिणी ही श्रीमंत कुटुंबातली. आई-वडील रागिणीला हवे नको ते सर्व काही पुरवत होते. तेवढेच नाही, तर रागिणी मागायच्या अगोदर तिला गोष्टी मिळत होत्या. त्यामुळे विचाराने व वागणुकीने व तिला घरातून मिळालेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यामुळे पुढारलेली अशी रागिणी पण चंचल वृत्तीची. कॉलेजमधल्या अजय नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली आणि हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. रागिणी घरच्यांशी खोटं बोलून अजयबरोबर फिरत बसायची. अजयबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाचे तिने आपल्या घरी समजून दिले नाही आणि अचानक एक दिवस रागिणी आणि अजय याने लग्न करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. पण, रागिणीने अजयसमोर एक अट टाकली की., मी तुझ्या घरी नांदायला येणार नाही, जोपर्यंत तू माझ्या आई-वडिलांचे मन प्रवृत्त करत नाही, तोपर्यंत अजयनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं. त्या दिवशी अजय आपल्या घरी व रागिणी आपल्या घरी राहू लागले. दोघांच्याही घरच्यांना त्यांनी लग्न केलं आहे, याची जराशी चुणूक लागू दिली नाही. पण ज्या ज्या ठिकाणी अजय जायचा, त्या त्या ठिकाणी रागिणी त्याच्यासोबत असायची. एवढंच नाही, तर घरच्यांशी खोटं बोलू रागिणी मैत्रिणीकडे जाते असं सांगून अजय बरोबर राहायची आणि कायद्याने आता ती नवरा बायको होती. त्याच्यामुळे त्यांचे शारीरिक संबंधही निर्माण झालेले होते. अजूनही ती आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत होती आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनचा काळ आला आणि अजय तिच्यावर नांदायला येण्यासाठी अनेक प्रकारे विनवण्या करू लागला. तर तिचं असं म्हणणं होतं की, तू लग्न करताना सांगितलं होतं की, मी तुझ्या आई-वडिलांचं मन प्रवृत्त करेन. आपलं लग्न एक्सेप्ट करण्यासाठी त्यांची विनवणी करीन. ते तू केलेले नाहीयेस. त्याच्यामुळे मी नांदायला येणार नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले आणि वाद होताना रागिणीला अजयबद्दल काही गोष्टी समजू लागल्या. अजयचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे व त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालू आहे, याची माहिती तिला मिळाली आणि ती नांदायला यावी म्हणून तो खालच्या थरापर्यंत जाऊन वागायला लागला आणि एवढंच नाही तर तिच्या नातेवाइकांकडे जाऊन तिची बदनामी करू लागला आणि ज्या आई-वडिलांनी तिने लग्न केलेले माहीत नव्हतं तेही आता त्यांना समजलं होतं. कारण हा अजय नातेवाइकांकडे जाऊन पुरावे दाखवू लागला.

तिच्या आई-वडिलांकडे येऊन त्यांची विनवणी करणे ते सोडूनच द्या, पण नातेवाइकांकडे जाऊन तिच्याबद्दल नको ते सांगून तिची बदनामी करू लागला. रागिणीच्या आई-वडिलांनाही लग्न मान्य नव्हतं आणि म्हणून ते तिला त्याच्याकडे पाठवत नव्हते या मुलापासून आपल्या मुलीची सुटका कशी होईल, हे तिचे आई-वडील बघू लागले आणि तोपर्यंत रागिणीला अजयचे सगळे प्रताप कळून चुकले. तो आपल्या आई-वडिलांची विनवणी करणार नाहीये फक्त मला तो यायला सांगतोय हे तिला कळून चुकलं होतं. कारण आतापर्यंत तिच्या अनेक नातेवाइकांना भेटला होता. नातेवाइकांना पुरावे दाखवत होता लग्नाचे. पण, तिच्या आई-वडिलांकडे तो येत नव्हता. त्यामुळे घरातील लोकांनी हे लग्न मान्य केलं नाही आणि करतही नाहीत. यामध्ये रागिणी चांगल्याच प्रकारे फसली. अजयवर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर आई-वडिलांच्या विरुद्ध जाऊन कोर्ट मॅरेज केलं होतं आणि आता हळूहळू अजयचे समोर येऊ लागले होते. घरच्यांनी विचारविनिमय करून वकिलांचा सल्ला घेऊन अजय विरुद्ध नले टी 12Ic प्रमाणे कोर्टामध्ये केस दाखल केली. आपल्या विरुद्ध केस दाखल केली, हे समजतात अजय अजून चवताळला व तो अजून रागिणीच्या नातवाइकांकडे जाऊन पुरावे दाखवू लागला व तिचे नातेवाईक आणि समाजामध्ये तिची बदनामी करू लागला आणि तिच्याविरुद्ध हिंदू मॅरेज ॲक्ट ९ प्रमाणे केस दाखल केली व त्याने कोर्टाला असे काही पुरावे दिलेले आहेत. त्या पुराव्यातून असं वाटतंय की, तिच्यावर तो नादायला येण्यासाठी दबाव टाकतोय. तिला घाणेरडे घाणेरडे शब्द बोलतोय आणि इकडे तर मी तिला आता नांदवणार नाही. माझी समाजात बदनामी झाली. तिच्याशी लग्न करू असे म्हणतोय.

रागिणीने प्रेमाच्या भरात अजयबरोबर कोर्ट मॅरेज केलं, पण करताना माझ्या आईविना वडिलांची विनवणी कर, त्यांची समजूत घाल व मग आपण एकत्र राहू. माझ्या आई-वडिलांनी लग्नाला संमती दिली की, आपण संसार करू असं वचन अजयकडून तिने घेतलं, पण अजयने कोर्ट मॅरेज केलं. पण, तिच्या आई-वडिलांची विनवणी होणे किंवा त्यांचं मन प्रवृत्त तो करू शकला नाही. ती कायद्याने आता माझी बायको आहे. मी त्यांची का विनवणी करू, हा इगो अजयच्या आणि रागिणीच्या आड लागला. तिने माझ्याशी लग्न केलेले आहे, तर तिनेच यावं. मी त्यांच्या दारापर्यंत जाणार नाही, अशी अजयने एकेरी भूमिका घेतली आणि इकडे रागिणी आई-वडिलांना त्याने मला कसं फसवलं, त्यांनी माझ्याशी फसवून लग्न केलं, असं आपल्या घरामध्ये आणि आपल्या नातेवाइकांमध्ये दाखवून आपली पत सांभाळण्याचं काम ती करू लागली आणि एका बाजूला तू माझ्या आई-वडिलांची विनवणी कर, असेही अजयला बोलू लागली.

दोघांनीही एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न केलं आणि आता एकमेकांच्या विरुद्ध कोर्टात उभे आहेत. रागिणीच्या आई-वडिलांनी रागिणीला वैयक्तिक स्वातंत्र प्राप्त करून दिलं आणि त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा मात्र या रागिणीने उचलला आणि त्याचा परिणाम आता मात्र संपूर्ण कुटुंबाला होत आहे.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -