Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी केंद्र सरकारचा...

Lok Sabha Election 2024 : शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) प्रत्येकाचे मत विचारात घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता मतदान केंद्रे (Voting Centres In Co operative Society) सुरू करण्यात येणार आहेत.

यापूर्वी निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होतं. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता मात्र शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावं लागणार आहे. मात्र, या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील मतदारांची संख्या वाढल्याने ३६ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

पुण्यातील मतदारांची संख्या वाढली

पुण्यातील मतदारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पुण्यात एक लाख ७५ हजार मतदारांची संख्या वाढली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -