Monday, May 20, 2024
Homeविदेशलिवरपूलची अंतिम चषकावर मोहोर

लिवरपूलची अंतिम चषकावर मोहोर

एफए कप फुटबॉल स्पर्धा

लंडन (वृत्तसंस्था) : चेल्सीला नमवून लिवरपूलने इमिरेट्स एफए कप फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले. ९० हजार प्रेक्षकांनी भरलेल्या वेंमबले स्टेडियममध्ये झालेला सामना लिवरपूलसाठी अविस्मरणीय ठरला. लिवरपूलने २००६ नंतर पहिल्यांदाच या जुन्या स्पर्धेत जेतेपद पटकावले. या सामन्यातील विजयामुळे लिवरपूलने चेल्सीविरुद्धच्या २०११-१२ च्या मोसमातील पराभवाचा वचपा काढला.

दीड तासांपेक्षा अधिक वेळ चाललेला हा सामना लिवरपूलने ६-५ असा जिंकला. चेल्सीने सलग तिसऱ्या मोसमात या स्पर्धेचा अंतिम सामना गमावला आहे. सलग तीन मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणारा चेल्सी हा पहिला क्लब ठरला आहे. या स्पर्धेला फुटबॉलमधील सर्वात जुन्या स्पर्धेचा दर्जा आहे.

स्टार फुटबॉलपटूंचा भरणा असलेल्या लिवरपूलच्या संघाने आठव्यांदा एफए स्पर्धेचा किताब पटकावला आहे. त्यांनी १९६४-६५, १९७३-७४, १९८५-८६, १९८८-८९, १९९१-९२, २०००-०१, २००५-०६ या वर्षांत इमिरेट्स एफए कपचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. सात वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. रोमांचक झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना सुरुवातीला गोल करण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या २० मिनिटांपर्यंत लिवरपूलचे खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. त्यानंतर मध्यांतरापर्यंत चेल्सीने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण लिवरपूलची बचाव फळी आणि गोलकीपरने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -