Monday, May 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLakhan Bhaiya fake encounter case : लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप...

Lakhan Bhaiya fake encounter case : लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्माला जन्मठेप

मुंबई : लखन भैया एन्काऊंटर (Lakhan Bhaiya fake encounter case) प्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांचे निर्दोषत्व रद्द करून हायकोर्टाने शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच शर्मा यांना तीन आठवड्यांत मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

२००६ च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी या २००६ मध्ये दाखल केलेल्या १६ अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.

या प्रकरणात २०१३ मध्ये सेशन कोर्टाने २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

वसईत राहणाऱ्या लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचे मुंबईतील वर्सोवा येथे एन्काऊंटर झाले होते.

या इन्काऊंटरचे नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावाने याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ज्या २०१३ मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात १३ पोलिसांसह २१ जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती.

मात्र लखन भैय्याचा भाऊ आणि वकील राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केली होती. राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात युक्तिवाद केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -