Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनचला फिरूया, अनुभवसमृद्ध होऊया...

चला फिरूया, अनुभवसमृद्ध होऊया…

पुंडलिक पै, डोंबिवली

पै फ्रेंड्स लायब्ररीने २०१७ साली भारतातील पहिले पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन भरविले. वाचक आपल्या घरातील वाचून झालेली पुस्तके घेऊन येतात आणि त्याबदल्यात नाममात्र रु. १० प्रति पुस्तकामागे शुल्क देऊन प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या इतर वाचकांनी आणलेली पुस्तके निवडून घेऊन जातात. पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनामुळे वाचकांना दुर्मीळ पुस्तके हवी असलेली पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे हा उपक्रम वाचकांसाठी मेजवानी ठरलेला आहे. हा सोहळा १० दिवसांचा असून महाराष्ट्रातील अनेक वाचक या प्रदर्शनाला भेट देतात. या सोहळ्यासाठी वाचक आतुरतेने वाट पाहत असतात.

पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन हा सोहळ्यात दहा दिवस असून त्यात नवीन पुस्तकांची विक्री सुद्धा असते. त्याचप्रमाणे दहाही दिवस वाचकांसाठी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुद्धा असते. चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तीच्या मुलाखती, व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रमाची मेजवानी असते. या सोहळ्यासाठी दरवर्षी एक आगळा-वेगळा विषय आम्ही ठरवतो. (पु. ल. नगरी, ए. पी. जे. अब्दुल नगरी आणि विज्ञान आणि वैज्ञानिक)

पै फ्रेंड्स लायब्ररी, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आम्ही डोंबिवलीकर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयोजित हा उपक्रम शुक्रवार, दिनांक १९ जानेवारी २०२४ ते रविवार, दिनांक २८ जानेवारी २०२४ दरम्यान सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराथी, बंगाली, तमिळ, तेलुगू, ओडिसी, पंजाबी अशी बहुभाषिक पुस्तके लाखोंच्या संख्येने मांडण्यात आली होती. या प्रदर्शनात विज्ञान आणि वैज्ञानिक या विषयांवरील पुस्तके, कट आऊट, सुभाषिते दर्शवती मांडण्यात आली. या सर्वात रोज किमान हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

यंदाचे विशेष आकर्षण : वाचकांना पुस्तकांच्या सान्निध्यात आणण्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीने ६२ हजार ५०० पुस्तकांची जगातील पहिली भव्यदिव्य अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. डोंबिवली व अन्य परिसरातील २ लाखांहून अधिक वाचकांनी आणि १५००० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास भेट दिली. त्याचबरोबर या सोहळ्यात २२ जानेवारी २०२४ या दिवशी सामूहिक श्रीरामरक्षास्रोत पठणामध्ये १००० शालेय विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. दिवसाला कमीतकमी २००० वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यंदाचा विषय “विज्ञान आणि वैज्ञानिक” असल्याने या विषयातील पुस्तके, कटआऊट, सुभाषिते दर्शवली गेली. असा हा पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन सोहळा २०२४ ज्याकडे वाचनसंस्कृतीतील नवा प्रयोग म्हणून पाहिले जाते. अशा या संपन्न उपक्रमांमुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढतेय, यात तिळमात्र शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -