Sunday, May 19, 2024
Homeमहामुंबईनवी मुंबई पालिकेच्या सुका कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना गळती; दुर्गंधीयुक्त घाण पाणी...

नवी मुंबई पालिकेच्या सुका कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना गळती; दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर

नवी मुंबई (प्रतिनिधी) : पालिकेने स्वच्छ अभियान अंतर्गत ओला व सुका कचरा वाहतुकीसाठी यंत्रणा निर्माण केली आहे. परंतु या यंत्रणा मध्ये समाविष्ट असलेल्या कचरा वाहतूक करणारी वाहने जीर्ण झाली असून वाहनात असलेले घाण पाणी चक्क रस्त्यावर पडत आहे. याचा अनुभव नवी मुंबईकराना आला. सुका कचरा वाहतुकीसाठी आणलेल्या आरसी वाहनातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी पडत असल्याने त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एजी इनव्हायरो या नावाच्या ठेकेदाराकडे पालिकेच्या हद्दीत निघालेल्या कचऱ्याचे निर्यात करण्याचा ठेका सात वर्षांपूर्वी दिला आहे. ताफ्यात उपलब्ध असणाऱ्या कचरा वाहतुकीची ५८ वाहन खराब झाली आहेत. त्यामुळे वाहांनाच्या ज्या ठिकाणी कचरा गोळा करून क्षेपणभूमी मध्ये नेले जाते त्या ठिकाणी छिद्र पडल्याने कचऱ्यात असलेला घाण पाणी रस्त्यावर पडत असल्याचे दृश्य नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

नवी मुंबई प्रशासनाकडून सध्या सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्याचे अभियान जोरदारपणे चालू आहे. नियमित कचरा उचलणाऱ्या काही वाहनांना मध्ये बदल करून काही वाहने ही ओला तर काही वाहने सुका कचरा उचलतात. त्यामुळे सुका कचरा उचलणारी वाहने असली तरी त्या मधून घाण पाणी बाहेर पडत आहे.

नादुरुस्त झालेल्या वाहना विषयी तत्काळ सबंधित ठेकेदारास कळविले जाईल.तसेच तत्काळ वाहने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले जातील. -डॉ.बाबसाहेब राजळे, उपायुक्त, पालिका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -