Lavani : अप्सरा आली…

Share
  • हलकं-फुलकं : राजश्री वटे

रंगमंचावरील मंद प्रकाशात शांततेला भेदत… एक घुंगरू बोलतं… मग दुसरं… मग तिसरं…
अन् पडते ढोलकीवर हलकीच थाप! पायांना बांधलेलंं जड घुंगरांचं ओझं संभाळत… छम… छम… छम…

लयदार ठेका सुरू होतो आणि एक ठुमका झोकात… पाठमोऱ्या सम्राज्ञीचा!!

हळूहळू सगळे घुंगरू ताल धरत बोलायला, डोलायला, हसायला लागतात. छम… छम… छम्माक… छम… तशी तशी ढोलकीवरची थापही ठेका देत वाढत जाते अन् सुरू होते घुंगरू व ढोलकीची जुगलबंदी!

कमरेची लयदार हालचाल… मोराच्या पिसाऱ्यासारखा फुललेला पदर डोक्यावरून कमरेवर घरंगळतो अलगद! केसांच्या बांधलेल्या बुचड्यावर गजऱ्याची सुंदर आरास हळुवार हसते… अन् ती वळते… देखणं रूप साकारतंं… त्या रूपाला सौंदर्याची जोड लाभते शृंगाराने… लावण्य खुलत जातं… वातावरणात जल्लोष… अप्सरा आली !!!

तो ऐटबाज नखरा… अहाहा… नखशिखांत नजर भिरभिरते… प्रथम लक्ष वेधते भाळावरील ठसठशीत कुंकवावर… पौर्णिमेच्या गोल लालसर चंद्रासारखं भासतं! तर कधी अमावस्येनंतर दिसणाऱ्या नाजूक चंद्राची कोरच जणू!! काजळाने डोळ्यांच्या रेखीवपणात भरच घातली असते, टपोऱ्या डोळ्यांवरील पापण्यांची तोरणं खालीवर झुलवत ठेवण्यासाठी!!

धनुष्याकृती ओठांवरची लाली… मादकतेची सूचक अनुभूतीच… हनुवटीवरील हिरवं गोंदण देखणेपणात भरच घालत होतं… डोळ्यांचं पारणंं फिटेल असं ते रूप!

‘या रावजी… तुम्ही बसा भावजी…’

हा सूर भानावर आणतो…ते हळुवार मधाळ आर्जव… मानेचा झटका व लाडीक मुरका… अहाहा !! हाताची बोटं हनुवटीपर्यंत नेऊन, थोडं झुकून मुजरा करत स्वागत करण्याची तऱ्हाच न्यारी! अप्रतिम!!
चेहऱ्याच्या हालचालींवर झुलणाऱ्या झुमक्यांचा डौल नजर खिळवून ठेवतो…चाफेकळी नाकातील नथीचा नखरा तोरा दाखवितो… आरसपानी गळ्याला मिठी मारत कमरेपर्यंत झेपावणाऱ्या दागिन्यांची नजाकत भारीच… कमरेच्या लयदार ठुमक्यावर लचकणारा कंबरपट्टा/मेखला खासच… काचोळीच्या दंडावर वाकीचा दिमाख… आगळाच! कळीदार नऊवारी कमनीय बांध्यावर चपखल बसलेली!! गालाशी लगट करू पाहणाऱ्या लडिवाळ बटा, तसेच… कमानदार उडत्या भुवयांचे इशारे… कलेजा खलास!!

अशी ही घुंगरांवर साम्राज्य करणारी सौंदर्यसम्राज्ञी चांदणं शिंपडत अवतरते! विनंतीवजा लाडीक मागणी…
‘एक हौस पुरवा महाराज…’ असे नाजूक हावभाव…
फेटे उडालेच बघा… शब्दांचे तीर सुटून काळजाचा ठाव घेतात, बाण उरी लागतो… गडी घायाळ! सवाल-जवाब होतात… कधी कुरघोडी… कधी हार-जीतही! हळूच विचारणाही होते…
‘कसं काय पाटील, बरं हाय का?’
अशा नटखट प्रश्नाने पाव्हणं दचकलंच म्हून समजा… झालं… गाडी पलटी…
घोडे फरार !! ढोलकीच्या तालावर… घुंगराच्या नादावर… शिट्यांचा गजर असतो… उत्साहाचा बहर असतो…
इष्काचा भर असतो… खट्याळपणाचा कहर असतो!!!

कधी डोळ्यांत आभाळ असतं… कधी मोकळे आकाश असतं… कुणी छळणारं असतं… कुणी तारणारं ही असतं !!! ‘आता वाजले की बारा…’ अशी घराची ओढ असते!

सुलोचना बाईंच्या भरदार करड्या आवाजापासून बेला शेंडेच्या गोड मधुर आवाजापर्यंतचा… गावंढळ भाषेतील लावण्यांचा हा प्रवास! पिंजरा ते नटरंग, चंद्रमुखी… कधी कथा असते तर… कधी व्यथा असते…

घुंगरावर जीव ओवाळून टाकणारं हे लावण्य… गातंसुद्धा! तरी… हे सौंदर्य मर्यादा राखून असतं…
‘हात नका लावू माझ्या साडीला……!’

Tags: lavani

Recent Posts

RBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या…

22 mins ago

Kareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर…

30 mins ago

Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खुलासा

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ? दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे.…

1 hour ago

Devendra Fadnavis : ….आणि म्हणूनच पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही!

'अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल' देवेंद्र फडणवीस यांचा…

1 hour ago

Abdu Rozik : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारी पत्नी?

अबुधाबी : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. त्याची…

2 hours ago

Sitapur Murder Case : धक्कादायक! तरुणाने स्वत:च्याच कुटुंबियांची केली घृणास्पद हत्या

आईवर गोळ्या झाडून, पत्नीला हातोड्याचा मार तर मुलांना गच्चीवरून फेकले! सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर…

2 hours ago