Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIPL 2024कोलकाताचा हैदराबादवर थरारक विजय

कोलकाताचा हैदराबादवर थरारक विजय

५ धावांनी मारली बाजी

हैदराबाद (वृत्तसंस्था) : यंदाच्या हंगामातील ४७व्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाताने हैदराबादवर अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना रिंकू सिंह आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या हैदराबादची आघाडीच्या फळीनीही निराश केले. अवघ्या ५४ धावांवर त्यांचे ४ फलंदाज माघारी परतले होते. कर्णधार एडन मारक्रमने हेनरिच क्लासेनसोबत हैदराबादचा डाव सावरला. या जोडगोळीने हैदराबादला विजयाची आस दाखवली. या जोडीच्या भागिदारीमुळे कोलकाताला पाचव्या विकेटसाठी १२४ धावांपर्यंत वाट पहावी लागली. हेनरिच क्लासेन आणि एडन मारक्रम ही सेट झालेली जोडी बाद झाल्यानंतर कोलकाताने सामन्यात पुनरागमन केले. क्लासेनने ३६, तर मारक्रमने ४१ धावा जोडल्या. त्यानंतर अब्दुल समदने हैदराबादला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र थरारक असा हा सामना हैदराबादने ५ धावांनी गमावला. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ६ धावांची आवश्यकता होती. वरुण चक्रवर्तीने हा चेंडू अप्रतिम फेकत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादला निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १६६ धावाच जमवता आल्या. कोलकाताच्या वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले.

कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंह यांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार खेळीच्या बळावर कोलकाताने नऊ विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. अवघ्या ३५ धावांवर त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. अशा संकटकाळात रिंकूने ४६, तर राणाने ४२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. आंद्रे रसेलने २४, तर जेसन रॉयने २० धावांची भर घातली. कोलकाताचे अन्य फलंदाज मात्र धावा जमवण्यात अपयशी ठरले. रिंकू सिंहने मोक्याच्या क्षणी वादळी फलंदाजी केली. पहिल्यांदा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरीस धावा जमवल्या. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू सिंह याने कर्णधार नीतीश राणा याच्यासमोबत ६१ धावांची महत्त्वाची भागिदारी केली. राणा बाद झाल्यानंतर रिंकूने रसेलसोबत १८ चेंडूंत ३१ धावांची भागिदारी केली. कर्णधार नीतीश राणा याने ३१ चेंडूंत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये राणा याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. तर आंद्रे रसेल याने १५ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. हैदराबादकडून मार्को जानसेन आणि नटराजन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -