Monday, May 20, 2024
Homeक्रीडाKL Rahul: सेंच्युरियनमध्ये शतक ठोकत केएल राहुलने रचला इतिहास

KL Rahul: सेंच्युरियनमध्ये शतक ठोकत केएल राहुलने रचला इतिहास

मुंबई: भारत(india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने(kl rahul) जबरदस्त शतक ठोकले. त्याने १३७ बॉलमध्ये १०१ धावांची खेळी करत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येवर नेले. त्याने अशा वेळेस ही खेळी केली जेव्हा रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीझवर टिकू शकला नव्हता.

केएल राहुलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा स्कोर अडीचशेच्या जवळपास जाण्यास मदत झाली. सोबतच त्याने नवे इतिहासही रचले. त्याचे हे शतक विकेटकीपर म्हणून आले. अशातच या शतकामुळे ७० वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी केली.

केएल राहुल दुसरा भारतीय विकेटकीपर आहे ज्याने विकेटकीपिंग करतानाच्या पहिल्या कसोटीत शतक ठोकले. याआधी १९५३मध्ये विजय मांजरेकरने वेस्ट इंडिज दौऱ्यावर विकेटकीपर म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकले होते.

केएल राहुलचे दक्षिण आफ्रिकेतील हे दुसरे शतक आहे. त्याने पहिले शतकही सेंच्युरियनमध्येच ठोकले होते. तो एकमेव परदेशी फलंदाज आहे ज्याने सेंच्युरियनमध्ये दोन शतके ठोकली आहेत.

दक्षिण आफ्रिकेत एकाहून अधिक शतक ठोकण्याच्या यादीत सचिन आणि विराटनंतर याचाच नंबर लागतो. इतर कोणत्याही फलंदाजाने आफ्रिकेत एकाहून अधिक शतके ठोकलेली नाहीत.

केएल राहुलने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये विकेटकीपर म्हणून पहिल्या सामन्यात ५०हून अधिक धावसंख्या केली.विकेटकीपर म्हणून पहिल्या वनडेत ८० धावा, विकेटकीपर म्हणून पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५६ धावा आणि आता विकेटकीपर कसोटीत १०१ धावांची खेळी केली.

आशियाबाहेर केएल राहुलचे हे सहावे कसोटी शतक आहे. गेल्या १५ वर्षांत विराट कोहलीने याबाबत सर्वाधिक शतक ठोकली आहेत. या दरम्यान अजिंक्य रहाणेने ६ कसोटीत शतक ठोकली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -