Sunday, May 19, 2024
HomeदेशKerala Blast: केरळमधील स्फोटानंतर देशातील अनेक शहरांमध्ये अलर्ट

Kerala Blast: केरळमधील स्फोटानंतर देशातील अनेक शहरांमध्ये अलर्ट

कोची: केरळच्या कोचीमध्ये(kochi) एका कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना सभा सुरू असताना जोरदार बॉम्बहल्ला झाला. स बॉम्बस्फोट झाला तेव्हा प्रार्थनेसाठी २०००हून अधिक लोक एकत्र जमले होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रार्थना सभेचे आयोजन शहरातील कन्वेशन सेंटरमध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत या स्फोटाचे कारण समजलेले नाही.

ख्रिश्चन धर्माचा एक समूह कन्वेशन सेंटरमध्ये प्रार्थना करत होता. तेव्हा जोरदार बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक ठिकाणी जोरदार किंकाळ्यांचे आवाज येत होते. स्फोटानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये तुटलेल्या काचा आणि फर्निचर दिसत आहे. हा स्फोट यहोवाच्या साक्षियांच्या प्रार्थनेदरम्यान झाला.

केरळ स्फोटानंतर दिल्ली पोलीस अलर्ट

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या कलामासेरी स्थित कन्वेशन सेंटरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलीसही हाय अलर्ट मोडवर आहे. गर्दी असलेल्या ठिकाणांवर नजर ठेवली जात आहे. स्पेशल सेल सातत्याने गुप्तहेर एजन्सीच्या संपर्कात आहे. कोणतेही मिळालेले इनपट हलक्यात घेतले जाणार नाही. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

घटनेच्या मागील सूत्रधारांचा तपास सुर – परराष्ट्र राज्य मंत्री

परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले या घटनेबाबत केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. मला विश्वास आहे की ते या घटनेच्या मुळापर्यंत जातील आणि या स्फोटामागचे कारण आणि सूत्रधाराचा तपास घेतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -