Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीकेजरीवालांनी ईडीचे समन्स तिसऱ्यांदा धुडकावले

केजरीवालांनी ईडीचे समन्स तिसऱ्यांदा धुडकावले

नवी दिल्ली : एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीने जारी केलेला हजर राहण्याचा समन्स धुडकावून लावला आहे. बुधवारी त्यांना ईडीसमोर हजर रहायचे होते, परंतू त्यांनी लिखित उत्तर पाठवत तुमची नोटीसच अवैध असल्याचे म्हटले आहे.

यामुळे आता पुढे काय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे ईडीची धास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना दिल्लीत राहून केंद्राच्या सर्वात शक्तीशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस केजरीवाल यांनी केले आहे. यामागे केजरीवाल काही लपवत आहेत की राजकीय फायदा करून घेणार आहेत असा प्रश्न राजकीय धुरीनांना पडला आहे.

आप या प्रकरणी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा देत आहे. यामुळे ईडीचे आता पुढचे पाऊल काय असेल यावरही दिल्लीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. परंतु केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -