मुंबई: पर्स लहान असो वा मोठी तसेच ते महिलांचे असो वा पुरुषांची. सामान्यपणे पैसे ठेवण्यासाठी पर्सचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जाते.
तर काही गोष्टी पर्समध्ये ठेवल्यास धनसंबंधित त्रासांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया पर्समध्ये कोणत्या त्या ५ गोष्टी ठेवल्यास पैशांची कमतरता राहत नाही.
पर्समध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाचा फोटो ठेवू शकता. अथवा कागदावर स्वस्तिकचे चित्र काढा. मात्र हे सर्व फोटो फाटलेले असता कामा नये. पर्समध्ये हे फोटो ठेवल्याने तुमचे पैसे चुकीच्या जागी खर्च होणार नाही.
पर्समध्ये रूपये अथवा पैसे नीट ठेवा. ते दुमडून ठेवू नका. सोबतच नोटा आणि कॉईन एकत्र ठेवू नका.
पर्समध्ये सोने अथवा पितळेची नाणी ठेवा. हे तुकडे गंगाजलाने धुवून गुरूवारी आपल्या पर्समध्ये ठेवा आणि दर महिन्याला हे धुवून शुद्ध करत राहा. यासोबतच स्थायी धन राहील.
पर्समध्ये एक अथवा दोनपेक्षा अधिक कागद असता कामा नये. जर तुम्ही सर्व कागद पर्समध्ये ठेवत असाल तर यामुळे पैसा उगाचच खर्च होऊ शकतो.e
पर्समध्ये आपल्या राशीशी संबंधित वस्तू जरूर ठेवा. मग ती छोटी असो वा मोठी. यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.
सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला संताप मुंबई : लोकसभेसाठी (Loksabha Election) आज राज्यात चौथ्या…
मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच अनेक बँकांकडून तसेच विभागाकडून अनेक नियमांमध्ये बदल केले…
जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षण मंडळा कडून बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक…
कसा डाऊनलोड कराल निकाल? नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे रोजी…
जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024)…
मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि…