कतरिना कैफ आणि विकी कौशलचा शाही विवाह सोहळा संपन्न

Share

जोधपूर : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा आज जोधपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला कतरिना आणि विकीच्या काही मोजक्याच नातेवाईकांची उपस्थिती होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी कतरिना कैफने भरजरी कॉश्च्यूम परिधान केले होते.

 

सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात ही रॉयल वेडिंग पार पडली. कतरिना -विकीच्या लग्नासाठी सिक्स सेन्सेस या राजमहालाच्या आवारात एक अतिशय भव्य मंडप तयार करण्यात आला.  याच मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडले.  .

 नववधू आणि वराच्या एंट्रीसाठी रथ आणि घोडाही तयार करण्यात आला होता अशी चर्चा रंगतेय. कतरिना कैफने  पारंपारिक डोलीमध्ये बसून मंडपात एंट्री घेतली. तर विकी कौशल हा घोड्यावर बसून मंडपात आला  

आज दुपारी साधारण १ वाजता फेटा बांधण्याचा विधी झाला, . यावेळी नवरदेवाला अगदी शाही थाटात फेटा बांधला गेला…यानंतर  विकी-कतरिनाने कुटुंब आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. . या लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप राजवाडा शैलीत बांधण्यात आला. तो अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता.

दरम्यान विकी आणि कतरिनाचा मेहंदी सोहळा ७ डिसेंबरला पार पडला. यात भरपूर पंजाबी गाणी आणि ढोल वाजवण्यात आले. तर ८ डिसेंबरला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर पाहुण्यांसोबतच विकी-कतरिनानेही डान्स केला.  ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लाटफॉर्मला या रॉयल वेडिंगच्या वितरणाचे हक्क देण्यात आले आहेत. 

Tags: katrina kaif

Recent Posts

महाभारतातील ज्ञानकर्ण

विशेष: भालचंद्र ठोंबरे अर्जुन युधिष्ठिरचा वध करण्यास निघतो, तेव्हाचा कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचा १७वा दिवस.…

3 hours ago

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचे ‘पंचम’ करणार गावांना सक्षम…

फिरता फिरता: मेघना साने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी…

4 hours ago

‘या’ मानसिकतेचे करायचे काय?

प्रासंगिक:अरविंद श्रीधर जोशी अगदी परवाचीच गोष्ट, एका बैठकीसाठी भाईंदरला गेलो होतो. ठाण्याला परत यायला निघालो.…

4 hours ago

सोशल मीडिया, प्री टीन्स आणि टीनएजर्स

आनंदी पालकत्व: डाॅ. स्वाती गानू हे तर निर्विवाद सत्य आहे की, प्री-टीन्स असो की टीनएजर्स…

4 hours ago

‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शक्तीपद राजगुरू यांच्या ‘नया बसत’ या कादंबरीवर आधारित ‘अमानुष’(१९७५)…

4 hours ago

मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी

कोकणी बाणा: सतीश पाटणकर मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले…

4 hours ago