Wednesday, May 22, 2024
Homeताज्या घडामोडीकान्होजी आंग्रे बेट पर्यटकांसाठी करणार लवकरच खुले - सर्बानंद सोनवाल

कान्होजी आंग्रे बेट पर्यटकांसाठी करणार लवकरच खुले – सर्बानंद सोनवाल

उरण (वार्ताहर) : मुंबई बंदर प्राधिकरण आता कार्गो बंदरातून पर्यटन बंदरात रूपांतरित करण्यात येणार असून या संदर्भात, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे, आरओ पॅक्स आणि वॉटर टॅक्सी वाहतूक सेवा आधीच कार्यरत आहेत आणि कान्होजी आंग्रे बेट पर्यटन लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल. याशिवाय, समुद्रावरील जगातील सर्वात लांब रोपवे प्रणाली मुंबईला एलिफंटा लेणीशी जोडण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनवाल यांनी केले.

केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदरास अर्थात जेएनपीए बंदरास भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेल्वे यार्डचे आणि प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराचा पहिला सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला व बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराने ३३व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केल्याबद्दल बंदर प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी सोनोवाल यांनी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, सागरमाला, मेरिटाइम इंडिया विज (एमआयवी) २०३० सारख्या सर्व उपक्रमांमध्ये जेएनपीए बंदर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून गेल्या तीन दशकांतील समर्पण आणि योगदान यामुळे जेएनपीए बंदर जागतिक स्तरावर नावरूपास आले असल्याचे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -