Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीVande Bharat Express : मराठवाड्याच्या लेकीची उंच भरारी; वडिलांच्या एसटीतील निवृत्तीनंतर आता...

Vande Bharat Express : मराठवाड्याच्या लेकीची उंच भरारी; वडिलांच्या एसटीतील निवृत्तीनंतर आता लेक चालवणार वंदे भारत एक्सप्रेस

जालना : महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आजवर अनेक महिलांनी आपल्या भारताचं नाव जगभरात गाजेल असं कर्तृत्व केलं आहे. यात महाराष्ट्रातील महिलांचा देखील फार मोठे आणि मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या कन्या आज जगभरात आपलं नाव कमावत आहेत. त्यातलीच एक कन्या म्हणजे मराठवाड्याची (Marathawada) कल्पना धनावत (Kalpana Dhanawat).

कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची (Vande Bharat Railway) असिस्टंट लोको पायलट (Assistant loco pilot) असणार आहे. आज जालना-मुंबई वंदे भारत एक्स्र्प्रेसला हिरवा कंदिल मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचं उद्घाटन करतील. या वंदे भारत एक्स्प्रेसचं सारथ्य मराठवाड्याची कल्पना करणार आहे.

कल्पनाचे बाबा एसटीमध्ये कर्मचारी होते. घरची परिस्थिती बेताची असतानाही कल्पनाने ही उंच भरारी घेतली आहे. हा नक्कीच खूप अभिमानास्पद अनुभव असल्याचं मत कल्पनाने व्यक्त केलं. “वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सहाय्यक चालक म्हणून जबाबदारी मिळणं हे अभिमानास्पद आहे. मराठवाड्यासाठी ही रेल्वे महत्वाची आहे. या रेल्वेमध्ये कित्येक नवीन फीचर्स आहेत.” असं ती म्हणाली.

गुरुवारी जालना ते मनमाडपर्यंत वंदे भारत रेल्वेची टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी देखील कल्पनाने सहाय्यक लोको पायलट म्हणून काम पाहिलं होतं. यानंतर आज उद्घाटनावेळी देखील लोको पायलट म्हणून तिचीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्याची मान नक्कीच उंचावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -