Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील कळशाने होणार प्रभू श्रीरामाचा जलाभिषेक

महाराष्ट्रातील कळशाने होणार प्रभू श्रीरामाचा जलाभिषेक

अयोध्या (वृत्तसंस्था) : देश आणि जगभरातील राम भक्त राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यातच या भव्य दिव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रत्येक जण विविध भेटवस्तू देत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तांब्याच्या कलशातून प्रभू रामाचा जलाभिषेक होईल. तर कन्नौजच्या अत्तराने राम मंदिर परिसर सुगंधित होईल. कन्नौजहून आलेल्या अत्तर व्यावसायिकाने राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना विविध प्रकारच्या परफ्यूम अर्पण केले.

कन्नौजनगरी ही अत्तरासाठी प्रसिद्ध आहे. कन्नौज येथून आलेले व्यावसायिक सगन यांनी सांगितले की, आम्ही कन्नौज येथून अत्तर घेऊन आलो आहोत. २२ तारखेला होणाऱ्या प्रतिष्ठापना कार्यक्रमात याचा वापर केला जाईल. सर्व नैसर्गिक फुलांपासून हे अत्तर तयार करण्यात आले आहे.

यामध्ये केवडा, गुलाब, खस, चंदनाचे अत्तर आहे, बेलाच्या अत्तराचा समावेश आहे. तर अशाप्रकारे अनेक प्रकारचे अत्तर आम्ही राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे दिले आहेत. महासचिव चंपत राय यांनी हे अत्तर २२ जानेवारीला होणाऱ्या महासोहळ्यात वापरले जावे, यासाठी तेथे उपस्थित पुजाऱ्यांकडे सोपवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -