Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीRajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है......

Rajiv kumar Shayri : झूठ के बाजार में रौनक तो बहुत है… काय म्हणाले राजीव कुमार?

फेक न्यूज पसरवणार्‍यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिला संदेश

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजीव कुमार यांनी सादर केलेली शायरी (Shayri).

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) पसरणार्‍या फेक न्यूजमुळे (Fake News) समाजात असंतोष निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा पत्रकारांकडून देखील पूर्णपणे खात्री करुन न घेता थेट बातमी दिली जाते. त्यामुळे लोक देखील याबाबत शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. यावर भाष्य करताना राजीव कुमार यांनी एक शायरी सादर केली.

राजीव कुमार म्हणाले, “सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक आवाहन आहे की, एकदा खात्री करुन घ्या. म्हणजे जी काही बातमी येते ती लगेच फॉरवर्ड करता कामा नये. हा एक खूप मोठा खोट्याचा बाजार आहे. मी याबाबत विचार करत असताना काही ओळी मला सुचल्या त्या ऐकवतो –
झूठ के बाजार में रौनक तो बहुत है
गोया बुलबुले जैसी तुरन्त ही फट जाती है
तुम्ही बुलबुला पकडायला गेलात तरी तुम्हाला यात धोकाच आहे, असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे एखादी माहिती पुढे पाठवायची की नाही यावर विचार करा’, असा संदेश त्यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -