Monday, May 20, 2024
HomeदेशThe Burning Plane : जपानमध्ये लँडिंग करताना विमानात लागली आग, जळत्या विमानातून...

The Burning Plane : जपानमध्ये लँडिंग करताना विमानात लागली आग, जळत्या विमानातून प्रवाशांनी मारल्या उड्या

टोकयो: भूकंपाच्या घटनेला अवघे २४ तासही झाले नाहीत तर जपानमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी टोकियोच्या हानेडा एअरपोर्टच्या रनवेवर दोन विमानांमध्ये टक्कर झाली. यामुळे जपान एअरलाईन्सच्या प्रवाशी विमानाला आग लागली. या दरम्यान प्रवासी विमान आगीचा गोळा बनून रनवेवर धावत होते. यात ३७९ प्रवासी प्रवास करत होते. यावेळी जळत्या विमानातून लोकांनी उड्या मारली आणि वेळेत सर्व प्रवासी सुखरूपरित्या बाहेर निघाले.

दुसरे विमान कोस्ट गार्डचे होते. यातील ६ क्रू मेंबर्सपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. कोस्ट गार्डचे हे विमान भूकंपप्रभावित लोकांना मदतीचे साहित्य पोहोचवण्यास जात होते. हे विमान पश्चिम किनारपट्टीवरील निगाटा एअरपोर्टच्या दिशेने जात होते. या विमानात भूकंप प्रभावित लोकांसाठीचे मदतीचे साहित्य होते. मात्र मदत पोहोचवण्याआधी या विमानाचा अपघात झाला.

 

या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रवासी विमान टक्कर झाल्यानंतर धूर येण्यास सुरूवात होते आणि रनवेवर धावत असते. जसे विमान थांबते तेव्हा इमरजन्सी गेटमधून प्रवासी उड्या मारून बाहेर येतात.

कोस्ट गार्ड विमानाने दिली टक्कर?

स्थानिक मीडियामध्ये दावा केला जात आहे की ही दुर्घटना तेव्हा झाली जेव्हा कोस्ट गार्डच्या विमानाने प्रवासी विमानाला टक्कर दिली.दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत आणि नेमकी काय चूक झाली याचा तपास केला जात आहे. सोबतच कोस्ट गार्डच्या ज्या क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -