Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray Group Vs Shivsena : घाटकोपरमधील नगरसेवकांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; शिवसेनेत केला...

Thackeray Group Vs Shivsena : घाटकोपरमधील नगरसेवकांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; शिवसेनेत केला प्रवेश…

मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्याच्या घटनेला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत ठाकरे गटातील बडे नेते आणि पदाधिकार्‍यांचा ओघ सुरुच आहे. ठाकरे गटात (Thackeray Group) मात्र अजूनही कोणी घरवापसी केलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. त्यातच आता घाटकोपरमधील (Ghatkopar) नगरसेवक उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत.

उबाठा गटाचे घाटकोपर भटवाडी येथील प्रभाग क्रमांक १२८ चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका सौ.अश्विनी हांडे यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यंत्र्यांनी त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाची माहिती आणि फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

यासोबतच उबाठा गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर यांनीही पक्षात प्रवेश केला. यावेळी मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -