Monday, May 20, 2024
Homeमहामुंबईबसेसमध्ये दिव्यांगाचा प्रवास होणार सुलभ

बसेसमध्ये दिव्यांगाचा प्रवास होणार सुलभ

एसटी महाव्यवस्थापकांचे निर्देश

नवी मुंबई (प्रतिनिधी) : दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन, महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात. तसेच विविध प्रकारचे दिव्यांग घटक त्याचा फायदाही घेत असतात; परंतु दिव्यांगाना एसटीमध्ये प्रवास करताना केंद्र शासनाकडून दिला जाणाऱ्या ओळखपत्राबाबत संभ्रम होता. त्यामुळे अनेकदा सवलतीच्या दरात प्रवास करताना दिव्यांगाना अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु खुद्द वाहतूक व्यवस्थापकांनी केंद्र शासनाचा दिव्यांग ग्राह्य धरण्याचे आदेश दिल्याने दिव्यांग नागरिकांना सवलतीचे प्रवास करता येणार आहे.

दीव्यांग नागरिकांना राज्य शासनाच्या बसेसमध्ये उपलब्ध असणाऱ्या तिकीट दराच्या पंचवीस टक्के तिकीट दर आकारले जात आहे. तर नवी मुंबई महानगपालिकेतील परिवहन उपक्रमात दिव्यांग नागरिकांना प्रवास विनामूल्य आहे. यामुळे दिव्यांग नागरिकांना पालिकेकडून एक आधार मिळत आहे. परंतु हे सर्व असताना देखील केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्रावर दिव्यांग सवलतीच्या दरात एसटीमध्ये प्रवेश करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले होते. तरीसुद्धा वाहकाकडून वैश्विक ओळखपत्र असताना देखील दिव्यांग सवलतीच्या दरापासून वंचित होते.

दिव्यांग नागरिकांना सवलतीत प्रवास देखील करून दिला जात नव्हता. या प्रकारच्या तक्रारी एसटी प्रशासनाला प्राप्त झाल्यावर आता नव्याने आदेश काढून वैश्विक ओळखपत्र असेल तर दिव्यांग नागरिकांना सवलतीत प्रवास करून द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्यातील सर्वच वाहतूक नियंत्रकाना दिले आहेत.

दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास करण्याकरिता केंद्र शासनाद्वारे नव्याने देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र देखील ग्राह्य धरण्या बाबत सर्व आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षिकीय कर्मचारी व वाहकांना सूचना देण्यात याव्यात. तसेच या विषयी कोणतीही तक्रार उद्भवणार नाही. याची काळजी घ्यावी. महाव्यवस्थापक (वाहतूक) एसटी मंडळ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -