Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांवर आयटीची धाड, नागपूर विभागाचे ४२ अधिकारी,३४ अधिकारी तळ...

नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांवर आयटीची धाड, नागपूर विभागाचे ४२ अधिकारी,३४ अधिकारी तळ ठोकून

बी. टी. कडलग, पवार-पाटकर, सांगळे, हर्ष कॅन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स यांचा समावेश असल्याची चर्चा

नाशिक : नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक पुन्हा एकदा आयकर विभागाच्या रडारवर आले असून यावेळी आयटीने शासकीय कंत्राटदारांवर लक्ष्य केल्याचे पडलेल्या छाप्यावरून दिसत आहे.

प्राथमिक माहिती नुसार बी. टी. कडलग, हर्ष कॅन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन,सोनवणे बिल्डर्स आदी व्यवसायिकांची कार्यालये, निवास एकाच वेळी १४ ठिकाणी शोध मोहीम सुरु असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे यातील काही मंडळी शासकीय कंत्राटदार असून खासदार, आमदारांशी हितसंबंध आणि काही व्यवसायिकांची नेते मंडळींशी भागीदारी असल्याची कुजबुज शहरात आहे. म्हणूनच या कारवाईकडे आश्चर्याने पाहिले जात आहे.

आज सकाळी सात वाजेपासून नागपूर आयकर विभागाचे नागपूर विभागाचे ४२ अधिकारी,३४ कर्मचाऱ्यांचे पथक शहरात दाखल असून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्यापूर्वीच यातील तिघांवर, जिएसटी विभागानेही कारवाई केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -