Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीसंसदेचा संबंध आदिवासी महिलांच्या सन्मानाशी जोडणे अयोग्य - मायावती

संसदेचा संबंध आदिवासी महिलांच्या सन्मानाशी जोडणे अयोग्य – मायावती

नवी दिल्ली : काँग्रेस-सपासह १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, असा या पक्षांचा युक्तिवाद आहे. दरम्यान, मायावती यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

सरकार संसदेचे बांधकाम करत आहे, त्यामुळे त्याचे उद्घाटन करण्याचाही अधिकार त्यांना आहे. उद्घाटनाला आदिवासी महिलांच्या सन्मानाशी जोडण्याच्या विरोधकांच्या मोहिमेवरही मायावतींनी टीका केली.

..तर मुर्मूविरुद्ध उमेदवार का उभा केला?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करताना या गोष्टीचा विचार व्हायला हवा होता, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, केंद्रात आधी काँग्रेस पक्षाचे सरकार असो किंवा आता भाजपचे असो, बसपने नेहमीच पक्षीय राजकारणाच्या वर उभे राहून देश आणि जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दिला आहे. या संदर्भात २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचेही पक्ष स्वागत करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसदेचे उद्घाटन न केल्यामुळे बहिष्कार अन्यायकारक असल्याचे मायावती म्हणाल्या.

मायावती म्हणाल्या की, मला देशाला समर्पित कार्यक्रमाचे, म्हणजेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे. याबद्दल धन्यवाद आणि माझ्या शुभेच्छा. परंतु पक्षाच्या सततच्या आढावा बैठकांबाबत माझ्या पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -